स्त्री-पुरूष समानतेसाठी कार्यरत असलेल्या ‘युएन वुमन इंडिया’व्दारे महिलांना प्रेरणा देण्यासाठी मुझे हक है हा म्युझिक व्हिडीयो लाँच झाला आहे. ह्या व्हिडीयोमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सशक्त महिलांना चित्रीत करण्यात आले आहे. ऐश्वर्या राय बच्चन, मिताली राज, सानिया मिर्झा, आशा भोसले, गौरी सावंत, डॉ. सईदा हमिद ह्या सशक्त महिलांसोबतच ह्या व्हिडीयोमध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर, अमृता खानविलकर आणि मिथिला पारकरलाही स्थान मिळालंय. युएन वुमन्स ही आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारी संस्था आहे. संस्थेच्या भारतीय शाखेतून भारतीय महिलांना आणि मुलींना प्रेरीत करणा-या व्हिडीयोमध्ये समाजातील वेगवेगळ्या स्तरातल्या नक्की कोणत्या महिलांना स्थान मिळावे, ह्यावर रिसर्च करण्यात आला. आणि त्यात सई ताम्हणकरची निवड करण्यात आली. ही नक्कीच एक महत्वाची गोष्ट आहे. सईने आपल्या करिअरच्या पंधरा वर्षांमध्ये फक्त मराठीच नाही तर भारतीय फिल्म इंडस्ट्रीवरही आपला ठसा उमटवलाय, हेच ह्यावरून सिध्द होते आहे. सई ताम्हणकर नुकतीच आपल्या लव्ह सोनिया सिनेमाच्या प्रिमीयरसाठी लंडनला गेली होती. मृणाल ठाकुर, रिचा चड्ढा, राजकुमार राव, फ्रिडा पिंटो आणि डेमी मोअर स्टारर ह्या सिनेमात सई महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
लव्ह सोनिया सिनेमामध्ये राजकुमार राव, रिचा चढ्ढा, सई ताम्हणकर, मनोज वाजपेयी, अनुपम खेर हे बॉलीवूडचे सितारे आणि डेमी मोर आणि फ्रिडा पिंटो ह्या हॉलीवूड अभिनेत्री दिसणार आहेत.लव्ह सोनिया हा दोन बहिणींचा सिनेमा आहे. सेक्स ट्रॅफिकिंगमध्ये अडकलेल्या सोडणाऱ्या बहिणीची गोष्ट आहे. सई ताम्हणकरच्या लव्ह सोनिया सिनेमाचे शूटिंग मुंबई, जयपूर, हाँगकाँग आणि लॉस एंजलिसमध्ये झाले आहे. लवकरच सप्टेंबरमध्ये हा सिनेमा रिलीज होईल.