सई ताम्हणकर मराठी रसिकांची दिलों की धडकन म्हणून ओळखली जाते. तिची प्रत्येक अदा रसिकांना घायाळ करणारी अशी वाटते. सौंदर्य, अदा आणि उत्तम अभिनयाचा अनोखा मेळ सईमध्ये दिसत असल्याने रसिक तिचं तोंडभरुन कौतुक करतात.सईने आजवर विविध भूमिकांमधून रसिकांची मनं जिंकली आहेत. दमदार भूमिका साकारणारी सई तितकीच स्टायलिश आहे.
तिने आपल्या स्टाईलनं रसिक मनात अढळ स्थान मिळवलं आहे.मराठी इंडस्ट्रीत बोल्ड आणि बिनधास्त अशी सईची ओळख आहे.सिनेमात विविध भूमिकांसाठी विविध स्टायलिश अंदाज धारण करणारी सई रिअल लाईफमध्येही तितकीच स्टायलिश आहे. तिच्या स्टाइल आणि फॅशनचा तिच्या चाहत्यांवरही प्रचंड प्रभाव पाहायला मिळतो.
सईनं सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. यातल्या फोटोमध्ये सईचा अंदाजाने सा-यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोमध्ये सईची देसी स्टाईल बघायला मिळत आहे. बांधलेले केस, गळ्यात मंगळसूत्र, साडी परिधान केलेला हा फोटो सोशल मीडियावर लक्षवेधी ठरत आहे. सईचा हा फोटो सोशल मीडियावर आकर्षण ठरतोय. एरव्हीप्रमाणे बोल्ड लूक नसला तरी तिच्या या फोटोला रसिकांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू आहे.
‘समांतर’ या मराठी वेब सिरीजचा दुसरा सिझन दाखल झाला आहे.नितीश भारद्वाज आणि स्वप्नील जोशी, तेजस्वीनी पंडित यांनी या मालिकेमध्ये दर्जेदार रंग भरले आहेत पण या मालिकेच्या दुसऱ्या पर्वामध्ये सई ताम्हणकर आल्याने या मालिकेमध्ये वेगळीच जान आणि ग्लॅमर आणले आहे.
‘समांतर’च्या पहिल्या पर्वाला तब्बल २०० दशलक्ष प्रेक्षकसंख्या मिळाली. या पर्वाची खूप वाहवा झाली आणि पुरस्कार मिळाले. सई ताम्हणकरचा या वेबसिरिजच्या माध्यमातूनही ग्लॅमरस अंदाजाने रसिकांना घायाळ करणार हे मात्र नक्की.