Join us  

लैंगिक शिक्षणावर सई ताम्हणकरनं निर्भीडपणे मांडल मत, म्हणाली - 'चांगला स्पर्श अन् वाईट स्पर्श..'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 12:00 PM

लैंगिक शिक्षणावर सई ताम्हणकर हिनं निर्भीडपणे आपलं मत मांडलं.

Sai Tamhankar on Sex Education : मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री अशी सई ताम्हणकरची (Sai Tamhankar) ओळख आहे. सईने फक्त मराठी इंडस्ट्रीच नव्हे तर बॉलिवूडमध्येही आपली खास ओळख निर्माण केली आहे. सईने नेहमीच विविध धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. तिची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.  चित्रपटसृष्टीवर ती कायमच भाष्य करत असते, शिवाय सामाजिक विषयांवर ती आपलं मत मांडताना दिसते. अशातच सईनं  लैंगिक शिक्षणावर ( Sex Education) भाष्य केलं आहे. 

समाजामध्ये आजही उघडपणे जो विषय बोलला जात नाही किंवा ज्याबद्दल कुणाशीच थेट संवाद साधला जात नाही अशा लैंगिक शिक्षणावर सई ताम्हणकर (Sai Tamhankar on Sex Education) हिनं निर्भीडपणे आपलं मत मांडलं. सईने हॉटर फ्लाय या यूट्यूब चॅनलला दिलेली मुलाखत सध्या चर्चेत आहे. लैंगिक शिक्षणाबद्दल बोलताना सई म्हणाली, 'मला या गोष्टींची माहिती आणि त्यावर बोलण्याची हिंमत ही घरातूनच मिळाली आहे. मी लहान असताना मला चांगला आणि वाईट स्पर्श कसा असतो, हे ओळखायला शिकवलं होतं. तसेच त्यांनी मला हे देखील शिकवले होते, की कोणी ओळखीतले असतील, तर ते असं वागणार नाहीत, असं नसतं'.

सई म्हणाली, 'माझे वडील मर्चंट नेव्हीमध्ये होते. त्यामुळे माझ्या आईने मला एकटीने सांभाळून वाढवलं आहे. त्यामुळे तिने कदाचित या गोष्टी मला शिकवल्या असतील. ती एक कणखर आई आहे. घराशिवाय शाळेत सुद्धा लैंगिक शिक्षण दिले जायचे. घर आणि शाळा हे दोन स्त्रोत होते, जे महत्त्वाचे होते. आपल्या देशात सेक्सला फार कमी महत्त्व दिले जात, असे मला वाटतं. खर तर तो नात्याचा खूप महत्त्वाचा भाग आहे. जेव्हा दोन जण एका नात्यात असतात, तेव्हा या गोष्टीकडे ते लक्षच देत नाहीत असे मी खूपदा ऐकले आहे, नात्यात सेक्स सर्वात शेवटी येतो. नातं ऑटो पायलेट मोडवर चाललंय आणि सेक्स सर्वात मागच्या सीटवर असतं. या विषयावर चर्चा करण्यासाठी दोघेही जोडीदार इच्छुक असणे गरजेचे आहे'.

सईच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, ती नागराज मंजुळेंच्या 'मटका किंग'मध्ये सई झळकणार आहे.  तिच्याजवळ 'ग्राउंड झिरो', 'अग्नी', 'डब्बा कार्टेल' हे प्रोजेक्ट आहेत. याशिवाय सईने आता अभिनयाव्यतिरिक्त वेगळ्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. ती उद्योजिका बनली आहे. सई ताम्हणकरने कपड्यांचा व्यवसाय सुरू केला आहे. मॅडम एस’ (Madame S) असे तिच्या ब्रॅण्डचं नाव आहे.  या नावाचा अर्थ "क्वीन ऑफ स्यासी ट्यूड" असा होतो. 

टॅग्स :सई ताम्हणकरसेलिब्रिटीबॉलिवूडमराठी अभिनेता