Join us

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बायोपीकमध्ये सई ताम्हणकरला करायचे आहे काम, वाचा काय म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 15:25 IST

सई ताम्हणकर हे मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचं नाव आहे.

सई ताम्हणकर (Sai Tamhankar) हे मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचं नाव आहे. अभिनय, मेहनत आणि टॅलेंटच्या जोरावर सईने केवळ मराठीच नाही तर बॉलिवूडमध्ये नाव कमावलं.  अभिनयाबरोबरच सई ओळखली जाते. ती तिच्या बेधडक स्वभावासाठी. अत्यंत परखडपणे ती तिची मतं मांडताना दिसते. सध्या पुन्हा सई चर्चेत आली आहे. 

अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेल्या सईला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा असल्याचे तिने सांगितले.  सईने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती विविध प्रश्नांची उत्तर देताना दिसून येत आहे. यामध्ये सईला विचारण्यात आलं की तिला कुणाची ऐतिहासिक व्यक्तीरेखा साकारायला आवडेल, यावर सई म्हणाली, 'सावित्रीबाई फुले या सुपरहिरो आहेत. त्यांची भुमिका करायला आवडेल. त्यांनी जे काम केलं ते क्रांतीकारी होतं'.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर सई नागराज मंजुळेंच्या 'मटका किंग'मध्ये सई झळकणार आहे.  तिच्याजवळ 'ग्राउंड झिरो', 'अग्नी', 'डब्बा कार्टेल' हे प्रोजेक्ट आहेत. याशिवाय सईने आता अभिनयाव्यतिरिक्त वेगळ्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. ती उद्योजिका बनली आहे. सई ताम्हणकरने कपड्यांचा व्यवसाय सुरू केला आहे. मॅडम एस’ (Madame S) असे तिच्या ब्रॅण्डचं नाव आहे.  या नावाचा अर्थ "क्वीन ऑफ स्यासी ट्यूड" असा होतो.

टॅग्स :सई ताम्हणकरसेलिब्रिटीसावित्रीबाई फुले