मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आज बॉलिवूडमधून तिचे स्थान निर्माण करताना दिसते आहे. सई लवकरच महाराष्ट्राच्या हास्यजत्रा शोमध्ये दिसणार आहे. नुकतेच तिने अवधूत गुप्तेच्या 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी सईने बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. इतकेच नाही तर तिने कलाविश्वात तिला आलेल्या अनुभवाबाबत मोठा खुलासा केला आहे.
खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात सई ताम्हणकरला अवधूत गुप्तेने मराठी चित्रपट क्षेत्रात पुरुषांना जशी वागणूक दिली जाते, तशी स्त्रियांना दिली जात नाही, याबद्दल विचारले. त्यावर सई म्हणाली की, पुरुषांचं यश स्त्रियांच्या तुलनेत जास्त चांगल्या पद्धतीने साजरे केले जाते. समान वेतन वगैरे या खूप दूरच्या गोष्टी आहेत. त्या तर अजून सिनेसृष्टीत घडलेल्याच नाहीत. तिच्या उत्तराने अनेक जण अवाक् झाले.
सईने सोनाली आणि तिच्या नवऱ्याला ठेवलं होतं उपाशीतसेच या कार्यक्रमात अवधुत गुप्ते सईला प्रश्न विचारतो तू लोकांना घरी जेवायला बोलवते आणि तासनतास त्यांना उपाशी ठेवतेस?, त्यावर उत्तर देताना सई म्हणाली, सोनाली कुलकर्णीला लग्न झाल्यावर तिला आणि तिच्या नवऱ्याला घरी जेवायला बोलवले होते. मी जेवण करेन असे सांगितले. आम्ही गप्पांमध्ये इतके रमलो की दुपारचे जेवण बनवता बनवता त्याची रात्र झाली. सईचे हे उत्तर ऐकून प्रेक्षकही हैराण झाले.
वर्कफ्रंट...सई ताम्हणकर शेवटची मधुर भांडारकरच्या इंडिया लॉकडाउनमध्ये झळकली होती. नुकतेच तिने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. यात ती परिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय ती कलरफुल चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत आहे.