Join us

Saie Tamhankar स्पेनमध्ये फिरतेय या व्यक्तीसोबत, एका फोटोतून मिळाली हिंट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 12:37 PM

Saie Tamhankar : सध्या सई ताम्हणकर स्पेनमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे आणि तिथले फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर (Saie Tamhankar) शेवटची इंडिया लॉकडाउन चित्रपटात झळकली आहे. या चित्रपटातील सईच्या कामाचं कौतुक झालं. सई सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. तसेच ती प्रोफेशनल लाइफसोबत खासगी लाइफमुळे चर्चेत येत असते. दरम्यान सध्या ती स्पेनमध्ये फिरते आहे. ती स्पेनमध्ये कोणासोबत फिरते आहे, हा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.  

सई ताम्हणकर हिने काही दिवसांपूर्वी निर्माता अनिश जोगला डेट करत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर बऱ्याचदा ते दोघे एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. सध्या सई स्पेनमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे आणि तिथले फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिने शेअर केलेल्या फोटोत ती एकटीच दिसते आहे. मात्र तसे नाही. ती अनिश जोगसोबत स्पेनमध्ये फिरायला गेली आहे. कारण ते दोघे तिथले फोटो शेअर करत आहेत. पण त्यांचे सगळे फोटो वेगळे होते, त्यातलाच एक फोटो दोघांनीही इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. त्यानंतर सई व अनिश एकत्र स्पेनमध्ये एकत्र असल्याचे समोर आले आहे.

कोण आहे अनिश जोग?अनिश जोग हा प्रसिद्ध चित्रपट निर्माता आहे. त्याने बऱ्याच मराठी चित्रपटांची निर्मिती केली. टाईमप्लीज, व्हायझेड, मुरांबा, गर्लफ्रेंड, धुरळा या चित्रपटांची निर्मिती त्याने केली आहे. 

टॅग्स :सई ताम्हणकर