Join us  

'हा तर मराठीतला रणवीर सिंग'; आकाशच्या नव्या फोटोवर चाहत्यांच्या अफलातून कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 11:41 AM

Akash Thosar: सैराटमध्ये दिसलेला साधाभोळा परशा आता कमालीचा बदलला आहे. दिवसेंदिवस त्याच्या फॅशनसेन्समध्ये बदल होत आहे.

'सैराट' या चित्रपटाच्या माध्यमातून तुफान लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे आकाश ठोसर. अलिकडेच त्याची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला झुंड हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यामुळे सध्या तो चर्चेत आहे. मात्र, चित्रपटाव्यतिरिक्त तो सोशल मीडियावरील वाढत्या वावरामुळेही चर्चेत येत आहे. गेल्या काही दिवसांपासून आकाशचा सोशल मीडियावरील वावर वाढला असून तो त्याचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करत आहे.

 सैराटमध्ये दिसलेला साधाभोळा परशा आता कमालीचा बदलला आहे. दिवसेंदिवस त्याच्या फॅशनसेन्समध्ये बदल होत आहे. इतकंच नाही तो काही हटके फॅशनही कॅरी करत आहे. यात अलिकडेच त्याने त्याच्या फोटोशूटमधील काही फोटो शेअर केले आहेत.

त्याच्या या फोटोवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. इतकंच नाही तर त्याची तुलना आता दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि रणवीर सिंग यांच्याशी केली आहे.

दरम्यान, 'अरे हा तर मराठीतला रणवीर सिंग', असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, 'हा सेम विजय देवरकोंडासारखाच दिसतो', असंही एकाने म्हटलं आहे. त्यामुळे सध्या त्याच्या या फोटोवर कमेंटचा तुफान पाऊस पडत आहे.

टॅग्स :आकाश ठोसरसेलिब्रिटीरणवीर सिंग