Rinku Rajguru Poem Video : ‘सैराट’ (Sairat) या चित्रपटातून एका रात्रीत स्टार झालेली आर्ची अर्थात रिंकू राजगुरू (Rinku Rajguru ) सतत चर्चेत असते. ‘सैराट’नंतर वेगवेगळ्या भूमिका निवडत रिंकूनं स्वत:ला सिद्ध केलं. अभिनेत्री म्हणून प्रवास सुरू करताना तिला बॉलिवूडमधल्या अनेक उत्तम दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधी मिळाली आणि तिने या संधीचं सोनं केलं. आताश: रिंकू मराठी चित्रपटसृष्टीतील मोठी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अभिनयात रिंकूला तोड नाही. तिचा पडद्यावरचा अभिनय तर तुम्ही बघितला आहेच. पण आज आम्ही तुम्हाला रिंकूच्या आणखी एका टॅलेंटबद्दल सांगणार आहोत. होय, रिंकू केवळ उत्तम अभिनेत्री नाही तर एक उत्तम कवयित्री सुद्धा आहे. विश्वास बसत नसेल तर बातमीसोबतचा हा व्हिडीओ तुम्ही बघायलाच हवा.
होय, रिंकूने पहिल्यांदाच कविता केली आहे आणि त्याचा व्हिडीओही शेअर केला आहे. तिच्या आवाजात तिची कविता ऐकून चाहते अगदी ‘सैराट’ झाले आहेत. रिंकूने हिंदीत कविता लिहिली आहे. या कवितेचा प्रत्येक शब्द हृदयाचा ठाव घेणारा आहे.
‘जब वो नहीं होता है तो वो खाली कमरा बहुत कुछ कहता है... शायद उसके ना होने की वजह होगी की उसे में महसूस करूं... अपने अंदर झांककर देखूं तो वो वहीं होता है मेरे भीतर...,’ अशी रिंकूची कविता सध्या चांगलीच व्हायरल होतेय. तिच्या या कवितेच्या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत.
कविता पण करता... लय भारी..., अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. मंजुळेंसोबतचे कलाकार मंजुळें इतकीच उत्तम कविता पण श्किलात की काय?अशी कमेंट अन्य एका चाहत्याने केली आहे. व्वा, अप्रतिक, खूपच सुंदर अशा असंख्य कमेंट्सही चाहत्यांनी केल्या आहेत.