गेल्या काही काळात बॉलिवूडमध्ये अनेक साऊथ सिनेमांचे रिमेक करण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे. विशेष म्हणजे हे रिमेक बॉक्स ऑफिसवर गाजलेदेखील. इतकंच नाही तर सध्याच्या काळात साऊथ सिनेमा प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालत आहेत. त्यामुळे या सिनेमांची वरचेवर चर्चा रंगत आहे. अनेक भाषांमध्ये त्यांचे रिमक होत आहेत. परंतु, या साऊथ सिनेमांमध्ये असे काही सिनेमे आहेत ज्यांनी चक्क मराठी चित्रपटांचा रिमेक केला आहे. ते सिनेमा कोणते हे पाहुयात.
साऊथमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यापासून ते स्वप्नील जोशी याच्यापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांच्या सिनेमांचे रिमेक करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे सिनेमा गाजलेदेखील.
मला आई व्हायचंय -
अभिनेत्री उर्मिला कोठारे हिची मुख्य भूमिका असलेला मला आई व्हायचंय हा सिनेमा २०११ मध्ये प्रदर्शित झाला. या सिनेमाचा २०१३ मध्ये रिमेक करण्यात आला. वेलकम ओबामा असं या तेलुगू रिमेकचं नाव होतं. या सिनेमातही उर्मिलानेच काम केलं होतं.
मुंबई पुणे मुंबई 2-
स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाचा तेलुगू रिकेम करण्यात आला. २०१८ हॅप्पी वेडिंग या नावाने तो सिनेमा प्रदर्शित झाला.
टाइमपास -
केतकी माटेगावकर आणि प्रथमेश परब यांची मुख्य भूमिका असलेला टाइमपास हा सिनेमा मराठी सिनेसृष्टीत विशेष गाजला. २०१४ मध्ये आलेल्या या सिनेमाचा २०१५ मध्ये आंध्रपोरी या नावाने तेलुगू रिमेक करण्यात आला.
आयचा घो -
२०१० मध्ये महेश मांजरेकर दिग्दर्शित हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाचं २०१२ मध्ये धोनी या नावाने तेलुगू सिनेमा आला.
झपाटलेला -
लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला हा सिनेमा १९९३ मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमातील तात्या विंचू हे पात्र विशेष लोकप्रिय ठरलं. या सिनेमाचा २००१ मध्ये ओम्बो बोमा हा तेलुगू रिकेम करण्यात आला होता.
अशीही बनवाबनवी -
सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सुशांत रे, सुधीर जोशी अशी तगडी स्टारकास्ट झळकलेला सिनेमा म्हणजे अशी ही बनवाबनवी. 1988 मध्ये आलेल्या या सिनेमाचा चित्रम भलारे विचित्रम हा तेलुगू रिमेक तयार करण्यात आला.
सैराट -
नागराज मंजुळेंचा सैराट या सिनेमा साऊथमध्ये रिमेक तयार करण्यात आला. मनसु मलिगे. असं या रिमेकचं नाव असून यात रिंकूनेच आर्चीची भूमिका साकारली होती.