Join us

"एका माकडाने काढले दुकान" आणि The Archiesमधील 'त्या' गाण्याचा व्हिडिओ सलील कुलकर्णींनी केला शेअर, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2024 11:42 AM

'द आर्चीज' आणि 'एका माकडाने काढले दुकान'चा एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बॉलिवूडमधील स्टारकिड्सचा 'द आर्चीज' हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. झोया अख्तरच्या या चित्रपटातून सुहाना खान, खुशी कपूर, अगस्त्य नंदा, वेदांग रैना यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. पण, स्टारकिड्सचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या फारसा पसंतीस उतरला नाही. या सिनेमातील 'वुली बुली' गाण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत सुहाना खान आणि खुशी कपूर डान्स करताना दिसत असून "एका माकडाने काढले दुकान" हे गाणं एडिट केलं गेलं आहे. 

'द आर्चीज' आणि 'एका माकडाने काढले दुकान'चा हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल झाला आहे. लोकप्रिय मराठी गायक सलील कुलकर्णी यांनीदेखील हा व्हिडिओ शेअर करत पोस्ट लिहिली आहे. 

सलील कुलकर्णींची पोस्ट 

"एका माकडाने काढले दुकान..आली गिऱ्हाईके छान छान "

विंदांच्या या कवितेचं मी १९९९ मध्ये गाणं केलं होतं...आत्ताची धृपद गायिका मेघना सरदार तेव्हा १०-११ वर्षांची होती,तिने ते गायलं होतं ....लहान मुलांच्या अनेक पिढ्यांनी हे मनापासून ऐकलं.... दाद दिली...नंतर अनेक YouTube channel ने ह्याचे उथळ हिंदी भाषांतर करून माझ्याच चालीत रिलीज केलं....मी अर्थातच "निषेध सुद्धा नोंदवलेला नाही"

मग हळूहळू मराठीतल्या पण अनेक YouTube चॅनल ने विंदा किंवा माझा उल्लेख न करता ते वाजवले , त्याचा व्हिडिओ केला. मी पुन्हा एकदा "जगभरातील मुलांनी ऐकलं ...त्यांना आवडलं हे खूप आहे " असा समजूतदार ( खरं तर बावळट आणि आळशी ) धोरण स्वीकारलं...

आता काही दिवसांपूर्वी हे गाणं ह्या धमाल editing सकट बघायला मिळालं ..ते सुद्धा viral झालं..आता तर मी निषेध वगैरे ओलांडून..हसण्याच्या स्टेज ला आलो आहे....

विंदांच्या घरी बसून त्यांना हे गाणं ऐकवलं होतं...त्यांनी हा व्हिडिओ पाहिला असता तर " माझ्या मना बन दगड * नावाची त्यांची कविता ऐकावयाला त्यांना अजून एक कारण सापडले असते...🤣🤣🤣

तर.."एका माकडाने काढले दुकान " या गाण्याचा प्रवास गमतीशीर चालू आहे....आजची छोटी मुलं सुद्धा ते गाणं ऐकातायत...विंदा....आपल गाणं HIT आहे..

"एका माकडाने काढले दुकान" ही कविता विंदा करंदीकर यांनी लिहिली आहे. याचं नंतर सलील कुलकर्णींनी गाणं केलं होतं.  सलील कुलकर्णींच्या या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

टॅग्स :सलील कुलकर्णीसेलिब्रिटी