Join us

झक्कास! सलील कुलकर्णींनी नवीन हॉटेलचं आईच्या हस्ते केलं उद्घाटन, कुठे आणि कसे जाल इथे...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2024 10:15 AM

सलील कुलकर्णी यांनी सोशल मीडियाद्वारे ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

 सध्या मराठी मनोरंजन व्यवसाय सुरू करण्याचे वारे वाहू लागले आहेत. कुणी हॉटेल सुरू करतंय कुणी तर स्वतःचा फॅशन ब्रँड. अशातच मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय गायक, संगीतकार, गीतकार, दिग्दर्शक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते सलील कुलकर्णींनीहॉटेल सुरू केलं असल्याचं समोर आलं आहे. आता सलील कुलकर्णी हे व्यावसायिक झाले आहेत. सलील कुलकर्णी यांनी सोशल मीडियाद्वारे ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

 पुण्यातील सिंहगडच्या खाऊगल्लीमध्ये स्वतःचं हॉटेल सुरू केलं आहे. बँगलोर कँटिनची फ्रँचायझीशी ते सहयोगी झाले आहेत. सलील कुलकर्णींच्या आईच्या हस्ते या 'बँगलोर कँटिनची फ्रँचायझी'चं उद्घाटन करण्यात आलं आहे.  याचा फोटो सलील कुलकर्णी यांनी इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर करत लिहिलं आहे, 'लहानपणी आई आम्हाला डोसा खायला घेऊन जायची. काल आम्ही तिच्या हस्ते बँगलोर कँटिनचं उद्घाटन केलं. नक्की भेट द्या सिंहगड रोड खाऊगल्ली येथील बँगलोर कँटिनला'.   नेटकऱ्यांनी या पोस्टवर कमेंट करीत सलील कुलकर्णी यांना त्याच्या नव्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

दरम्यान काही दिवसांपुर्वी सलील कुलकर्णींनी उद्योग क्षेत्रात पदार्पण करत असल्याची घोषणा एक व्हिडीओ शेअर करत केली होती. व्हिडीओमध्ये सलील कुलकर्णी म्हणाले होते की, आज मला दोन चांगल्या बातम्या द्यायच्या आहेत. भारताने विश्वचषक जिंकल्यामुळे आपण सर्वजण इतक्या छान मूडमध्ये आहोत. सगळ्यांचे चेहरे हसरे आहेत. म्हणून तुम्हाला मी आज दोन चांगल्या बातम्या द्यायचं ठरवलं आहे. लहानपणापासून ज्या-ज्या गोष्टींविषयी वेड होतं. म्हणजे चित्रपट तर चित्रपट केला. मग टेलिव्हिजन तर त्यात रिअ‍ॅलिटी शो केला. खूप गाणी केली. पण गाण्यांबरोबर अजून एक वेड म्हणजे खाणं. कुठेतरी असं वाटतं होतं की, खाण्यासंबंधित काहीतरी करायला हवं आणि असा विचार करत इथे (बँगलोर कँटीन) एक दिवस आलो. इथली चव बघितली. इथला डोसा खाल्ला. इथली कॉफी प्यायलो आणि असं वाटलं की, आपला काहीतरी सहभाग इथे हवाच. त्यामुळे बँगलोर कँटीनशी मी सहयोगी होतोय. आता माझा बँगलोर कँटीनमध्ये सहभाग असणार आहे. लवकरच नवीन ब्रँच सिंहगडच्या खाऊगल्लीमध्ये येत आहे'.

पुढे पुढे सलील कुलकर्णी म्हणाले होते की, 'दुसरी चांगली बातमी म्हणजे 'एकदा काय झालं'च्या राष्ट्रीय पुरस्कारानंतर सगळेजण विचार होते पुढला चित्रपट कधी? तर मी चित्रपट लिहित होतो, पण ही बातमी कधी सांगावी हे कळतं नव्हतं. पण विश्वचषक जिंकल्यानिमित्ताने मी ही बातमी सांगतो की, नवीन चित्रपट तयार आहे. गोष्ट लिहून तयार आहे. लवकरच त्याचं नाव आणि बाकी सगळ्या गोष्टी आम्ही जाहीर करू. बँगलोर कँटिनविषयी पुढच्या भागात नक्की सांगणार आहे'. या घोषणेप्रमाणे अखेर त्यांचं स्वतःचं हॉटेल  सिंहगडच्या खाऊगल्लीमध्ये खव्वयांसाठी सुरू झालं आहे. 

टॅग्स :सलील कुलकर्णीसेलिब्रिटीमराठीसिनेमामराठी चित्रपटसोशल मीडियापुणेहॉटेल