Join us

'सातारचा सलमान' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला,कोण आहे हा सलमान?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 11:36 AM

टेक्सास स्टुडियोजचे प्रकाश सिंघी निर्मित आणि सुरेश पै सहनिर्मित  'सातारचा सलमान' हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  ...

टेक्सास स्टुडियोजचे प्रकाश सिंघी निर्मित आणि सुरेश पै सहनिर्मित  'सातारचा सलमान' हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  ह्या सिनेमाचा नुकताच श्रीगणेशा करण्यात आला असून, नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच २९ सप्टेंबर रोजी 'सातारचा सलमान' या नव्या कोरया सिनेमाचा मुहूर्त झाला, प्रकाश सिंघी यांची निर्मिती असलेला हा पहिलाच सिनेमा असून, आपल्या चित्रपटनिर्मिती क्षेत्रातील पदार्पणाबद्दल ते भरभरून बोलतात. 'मी मूळचा नागपूरचा असून, मराठी भाषेसोबत माझी जन्मापासून नाळ जोडली गेली आहे. त्यामुळे मनोरंजनक्षेत्रात उतरताना सर्वप्रथम मराठीतूनच सुरुवात करण्याची माझी इच्छा होती, ह्या सिनेमाद्वारे ती पुर्णत्वास येणार आहे'. असे ते सांगतात. टेक्सास स्टुडियोजच्या बॅनरखाली यानंतर हिंदी तसेच इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपटांचीदेखील निर्मिती करणार असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. या सिनेमाची प्रदर्शनाची तारिख निश्चित नसली तरी हा सिनेमा पुढच्या वर्षी २०१८ च्या फेब्रुवारी महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे हा सिनेमा पाहण्यासाठी रसिकांना थोडी वाट पाहावी लागणार असल्याचे कळतं. तुर्तास या सिनेमातील कलाकारांबाबतची माहितीही गुलदस्त्यातच ठेवण्यात आले आहे.‘बघतोस काय मुजरा कर’ ह्या बहुचर्चित सिनेमानंतर हेमंत ढोमेचा हा दुसरा दिग्दर्शकीय सिनेमा आहे. हेमंतनेच लिहीलेला हा सिनेमा नक्कीच मनोरंजनाने परिपुर्ण असेल यात शंका नाही. पण 'सातारचा सलमान' नेमका कोण आहे? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.हेमंत ढोमेने 'बघतोस काय मुजरा कर' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले होते. हेमंतनेच चित्रपटाचं लेखन केलं होतं.एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट, गणराज प्रॉडक्शन यांनी चित्रपटाची निर्मिती केली होती. 'बघतोस काय मुजरा कर' या चित्रपटाचा ट्रेलर लोकार्पण सोहळा पुण्यातील सिंगहडावर करण्यात आला होता. शिवाजी महाराजांच्या गड किल्यांचे संवर्धन आणि जतन करावे तसेच महाराजांची शौर्यगाथा रुपेरी पडदयावर उलगड असतानाच आजच्या पिढीने पेटून उठावा असा संदेश देखील या सिनेमातून देण्यात आला होता. हेमंत ढोमेच्या बघतोस काय मुजरा कर या सिनेमामुळे विशेष कौतुक करण्यात आले होते. आता पहिल्यासिनेमाप्रमाणेच दुसरा सिनेमासाठीही हेमंत उत्सुक आहे.