दिग्दर्शक कैलाश काशीनाथ पवार यांच्या या पहिल्या मराठी सिनेमाचा मुहूर्त अभिनेता सोनू सूदच्या उपस्थितीत पार पडला होता .'पढेगा इंडिया तो बढेगा इंडिया' अशी टॅगलाइन असलेला हा सिनेमा बाल शिक्षणासारख्या विषयावर भाष्य करणारा आहे. अभिनेता उपेंद्र लिमये ह्यांनी चित्रपट सलमान सोसाइटी मध्ये एक पाहुण्या भूमिकेत दिसणार आहेत, काही दिवसांपूर्वी उपेंद्र लिमये ह्यांनी आपल्या भूमिकेचे डब्बिंग पूर्ण केले आहे.
सलमान सोसायटी ह्या चित्रपटात मध्ये आपल्या अभिनयाने सर्वाना प्रभावित करणारे गौरव मोरे , नम्रता आवटे महाराष्ट्रा ची हास्यजत्रा फेम आपल्याला एका वेगळ्या ,महत्वपूर्ण भूमिकेत दिसेल. तसेच ह्या चित्रपटात पुष्कर लोणारकर, शुभम मोरे आणि विनायक पोतदार ही प्रसिद्ध बच्चे कंपनी मुख्य भूमिकेत असणार आहेत. बाल कलाकार पुष्कर लोनकरने ह्या आदी एलिझाबेथ एकादशी, बाजी, रांजण, चि .व चि .सौ. का, फिरकी आणि टी. टी. एम. एम चित्रपटात अभिनय केलाय तर शुभम मोरे ह्याने हिंदी चित्रपट रईस मध्ये बालपणच्या शाहरुख़ खान ची भूमिका वटवली तसेच हाफ टिकिट, फास्टर फेने सारखे उत्तम मराठी चित्रपट केलेत तर बाल कलाकार विनायक पोतदार याने हाफ टिकिट ,माउली, ताजमहल आणि येरे येरे पावसा मध्ये भूमिका केल्या आहेत.
या चित्रपटातील एका गाण्याचे चित्रीकरण मुंबईत पार पडले होते. 'पार्टी दणाणली...' असे या गाण्याचे बोल असून पुष्कर लोणारकर, गौरव मोरे, शुभम मोरे आणि विनायक पोतदार यांच्यावर हे गाणे चित्रीत करण्यात आले. सलमान सोसायटीचे चित्रीकरण एकूण ३ शेडूल पूर्ण केले असून चित्रपटाचे चित्रीकरण आटपाडी,नाशिक,मुंबई , नवी मुंबई च्या जवळील भागातच झाले आहे तसेच चित्रपट ह्या वर्षी लवकरात लवकर प्रदर्शित करण्याचा मानस निर्मात्यांचा आहे.