मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी सुव्रत जोशी व सखी गोखले यांचा विवाह गेल्या महिन्यात ११ एप्रिलला पुण्यात मोठ्या थाटामाटात पार पडला. त्यांचे लग्न एप्रिल महिन्यात चर्चेचा विषय बनला होता. सखी सध्या लंडनमध्ये उच्च शिक्षण घेते आहे. त्यामुळे सखी व सुव्रत सध्या लाँग डिस्टंट रिलेशनशीपमध्ये आहे. मात्र सोशल मीडियावर त्यांचे अधून मधून एकत्र आल्याचे फोटो पहायला मिळत असतात.
आता सखी गोखलेला ख्रिसमसची सुट्टी असल्यामुळे ती भारतात आली आहे आणि नुकताच सखी व सुव्रतने नवा टॅटू बनवला आहे. दोघांनी सेम टू सेम टॅटू बनवला आहे.
सखी व सुव्रतने बनवलेल्या नवीन टॅटूचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. नक्षत्र, दिवस- रात्र, युनिव्हर्स यांचं प्रतिक असणारा टॅटू सुव्रतने त्याच्या हातावर तर सखीने मानेवर गोंदवला आहे.
सखीने तिला टॅटूची आवड असल्याचे मुलाखतीत सांगितलं होतं. सखीच्या हातावर तिच्या शाळेतून दिसणार्या पर्वतरांगांचं, सखीची आई शुभांगी गोखले यांचं नाव आहे. सोबतच फुलपाखरू असे एकूण चार टॅटू आहेत.
सखी-सुव्रत यांनी दिल दोस्ती दुनियादारी, दिल दोस्ती दोबारा या मालिकेत तर अमर फोटो स्टुडिओ या नाटकातून ही जोडी रसिकांच्या मनात खास जागा करून गेली आहे.