Join us

औरंगजेबच्या भूमिकेत समीर धर्मांधिकारी, 'शिवरायांचा छावा' लवकरच भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 3:03 PM

Shivrayancha Chhawa : दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शिवरायांचा छावा’ हा भव्य ऐतिहासिकपट १६ फेब्रुवारीला चित्रपटगृहात दाखल होत आहे.

स्वराज्याची धुरा खंबीरपणे आपल्या हातात घेऊन प्रचंड पराक्रम गाजविणारे, छत्रपती संभाजी महाराज  म्हणजे एक अद्वितीय व्यक्तिमत्व. धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणाऱ्या या महान योद्धयाचा इतिहास  मराठी रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित  ‘शिवरायांचा  छावा’ (Shivrayancha Chhawa)  हा भव्य ऐतिहासिकपट १६ फेब्रुवारीला चित्रपटगृहात दाखल होत आहे. ए.ए. फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटटेंमेंट या चित्रपटाचे  प्रस्तुतकर्ते आहेत या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. या चित्रपटात औरंगजेबच्या भूमिकेत अभिनेता समीर धर्मांधिकारी (Sameer Dharmadhikari) दिसणार आहे.

अभिनेता समीर धर्मांधिकारीचा शिवरायांचा छावा चित्रपटाती लूक शेअर करण्यात आला आहे. तो या चित्रपटात औरंगजेबच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा लूक पाहून चाहते त्याला या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत.  या चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास रुपेरी पडद्यावर  जिवंत होणार आहे. काही तासांतच या ट्रेलरने कमाल केली आहे. या ट्रेलरचे हिट्स सातत्याने वाढत असून प्रेक्षकांच्या पसंतीची पावती ट्रेलरला मिळाली आहे. 

मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर,भूषण पाटील, रवी काळे, समीर धर्मधिकारी, राहुल देव, विक्रम गायकवाड, भूषण  शिवतरे,अमित देशमुख,  तृप्ती तोरडमल, ईशा केसकर, प्रसन्न केतकर, अभिजीत श्वेतचंद्र, ज्ञानेश वाडेकर, आशुतोष वाडेकर, बिपीन सुर्वे, दीप्ती लेले, सचिन भिल्लारे आदि कलाकारांच्या भूमिका ‘शिवरायांचा  छावा’ चित्रपटात आहेत. मल्हार पिक्चर्स कं.चे वैभव भोर, किशोर पाटकर, मधू यांनी ‘शिवरायांचा छावा’ या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती केली आहे. सह-निर्मिती भावेश रजनीकांत पंचमतीया यांनी केली असून कार्यकारी निर्माता प्रखर मोदी आहेत. कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली असून पटकथा-संवाद आणि गाणी देखील त्यांचीच आहेत. गाण्यांना साजेसं संगीत युवा संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी दिलं आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी ए. ए.फिल्म्स सांभाळत आहे.

टॅग्स :समीर धर्माधिकारीदिग्पाल लांजेकर