एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे मुंबई क्रुज ड्रग्ज केस प्रकरणामुळे चर्चेत आले होते. या प्रकरणी त्यांची चौकशीही सुरू आहे. वानखेडे त्यांच्या बेधडक आणि निडर व्यक्तिमत्त्वासाठी ओळखले जातात. नुकतंच त्यांनी पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरसह एका मुलाखतीला हजेरी लावली होती. या मुलाखतीत त्यांनी वैयक्तिक आणि करिअरमधील अनेक मुद्द्यांवर दिलखुलासपणे भाष्य केलं.
बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव आणि रेडिओ जॅकी अनमोलच्या ‘कपल ऑफ थिंग्स’ या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत वानखेडेंनी त्यांच्या जीवनातील आदर्श व्यक्तींबाबत भाष्य केलं. ते म्हणाले, “आजकाल आपण चुकीच्या लोकांना आपले आदर्श मानत आहोत. तरुण मुलांनी खोटे हिरो आणि चुकीच्या आदर्शांपासून स्वत:ला वाचवलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे माझे पहिले आदर्श आहेत. त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शहीद भगत सिंग, तान्हाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, बटुकेश्वर दत्त यांना मी आदर्श मानतो. मी तर खूप छोटा स्ट्रगल केला आहे. पण, यांनी २३ वर्षांच्या वयात संपूर्ण ब्रिटीश साम्राज्याला दणाणून सोडलं होतं. मी तर ४४ वर्षांचा आहे. आजही त्यांची नावं ऐकली की अंगावर काटा उभा राहतो. हे आपल्या देशाचे खरे हिरो आहेत. आजच्या तरूणवर्गाला यांना फॉलो केलं पाहिजे.”
सोनाली बेंद्रेबरोबरच्या संवादानंतर केदार शिंदे भारावले, म्हणाले, “ज्या पद्धतीने त्यांनी…”
“आपण एसी रुममध्ये बसून सरकार, समाज यांच्यावर ताशेरे ओढतो. पण, तुम्ही देशासाठी काय करत आहात? काय केलं आहे? तुम्ही फक्त टीका करत आहात. पहिल्यांदा तुम्ही १० वर्ष देशाची सेवा करा. आर्मी, पोलीस, डॉक्टर अशा कोणत्याही क्षेत्रातून तुम्ही आधी देशाची सेवा करा. ग्रामीण भागात जाऊन त्या लोकांची मदत करा. पहिलं देशाची सेवा करा त्यानंतर तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे,” असंही ते पुढे म्हणाले.
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री हिंदी मालिकेत झळकणार, पोस्ट शेअर करत म्हणाली...
समीर वानखेडेंनी २०१७ साली मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरशी विवाह केला. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यांना जुळ्या मुली आहेत. क्रांती नेहमीच समीर वानखेडेंच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली दिसते.