Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:च्याच वेडिंग रिसेप्शनला समीर वानखेंडेंनी फक्त ३ तास लावलेली हजेरी, क्रांतीने सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 18:24 IST

क्रांती रेडकर आणि समीर वानखेडेंनी २०१७ साली लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती.

क्रांती रेडकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. क्रांतीने ‘काकण’, ‘करार’, ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’, ‘शुगर, सॉल्ट आणि प्रेम’ या चित्रपटांतून महत्त्वाच्या भूमिका साकारुन ती घराघरात पोहोचली. ‘कोंबडी पळाली’ या गाण्याने तिला विशेष लोकप्रियता मिळवून दिली. क्रांतीने २०१७मध्ये एनसीबीचे डॅशिंग अधिकारी समीर वानखेडे यांच्याशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. क्रांती आणि समीर वानखेडेंनी नुकतंच एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली.

बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव आणि तिचा पती रेडिओ जॉकी अनमोल यांच्या ‘कपल ऑफ थिंग्स’ या पॉडकास्टमध्ये क्रांती आणि समीर वानखेडेंनी हजेरी लावली होती. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या वैवाहिक जीवनावरही भाष्य केलं. एकमेकांबद्दलची मतं त्यांनी शेअर केली. समीर वानखेडे म्हणाले, “आता मी माझ्या मुलींना वेळ देत आहे. पण एके काळी रात्री उशिरा मी घरी यायचो तेव्हा त्या झोपलेल्या असायच्या. आणि सकाळी त्या उठायच्या अगोदरच मी कामासाठी घराबाहेर पडायचो. कधी कधी क्रांतीही झोपलेली असायची. फक्त फोनवर आम्ही बोलायचो. पण, क्रांतीने एकदाही मला वेळ देत नाही, याबद्दल तक्रार केली नाही. तिला पण भावना आहेत. कधी तिच्या वाढदिवसाला कर कधी तिच्या आईवडिलांच्या वाढदिवसाला मी हजर नसतो. आम्ही लग्नाचा पहिला वाढदिवसही सेलिब्रेट केला नव्हता.”

“तान्हाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे माझे आदर्श ”, समीर वानखेडेंचं वक्तव्य, म्हणाले, “आपल्या देशात...”

समीर वानखेडेंनी हे सांगितल्यानंतर क्रांतीने या मुलाखतीत तिच्या लग्नाचा एक किस्साही सांगितला. ती म्हणाली, “आमच्या वेडिंग रिसेप्शनमध्येही समीर फक्त तीन तासांसाठी आले होते. ते आले, थोडा वेळ स्टेजवर बसले आणि निघून गेले. फुलांनी सजवलेल्या गाडीतून मी एकटी घरी गेले होते. आम्ही असं जीवन जगतो. पण, या सगळ्यानंतर जेव्हा तुम्हाला ट्रोल केलं जातं, तेव्हा खूप वाईट वाटतं. पण या गोष्टींकडे दुर्लक्ष करणंच चांगलं आहे.”

सनी देओलच्या मदतीसाठी धावून आला अक्षय कुमार, बंगला वाचवण्यासाठी अभिनेता करणार ४० कोटींची मदत?

क्रांती आणि समीर यांच्या लग्नावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं होतं. तेव्हा क्रांतीने फोटो दाखवत आम्ही पारंपरिक पद्धतीने लग्न केल्याचं सांगितलं होतं. क्रांती आणि समीर यांना जुळ्या मुली आहेत. क्रांती अनेकदा समीर यांच्याबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

टॅग्स :क्रांती रेडकरसमीर वानखेडेनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो