Join us

'तलवारबाज मावळ्याच्या घोड्याचा अन् कुणब्यांच्या बैलजोडीचा नाद करायचा नाही'; जरांगे पाटलांच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 12:55 PM

'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' सिनेमाचा बहुचर्चित ट्रेलर रिलीज झालाय. या ट्रेलरमध्ये मनोज जरांगे पाटील यांची संघर्षकहाणी (SangharshYoddha Manoj Jarange Patil)

गेल्या काही दिवसांपासून 'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर हा सिनेमा आधारीत आहे.  मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांची जीवनकहाणी असलेला "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील" या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते अंतरवाली सराटी येथे या सिनेमाचा शानदार ट्रेलर लॉंच करण्यात आला.

ट्रेलरमध्ये काय पाहायला मिळतंय?

'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनपटाचा वेध पाहायला मिळतोय. लाठीचार्ज आणि गोळीबाराचा आदेश कोणी दिला? याशिवाय मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभारताना कोणत्या अडचणींचा जरांगेंना सामना करावा लागला? असे अनेक मुद्दे या चित्रपटाच्या माध्यमातून मांडले जाणार आहेत. अल्पावधीत महाराष्ट्रात चित्रपटाचा ट्रेलर व्हायरल झालाय. 

संघर्षयोद्धा सिनेमातले कलाकार

'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी शिवाजी दोलताडे यांनी निभावली आहे.  या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे,  माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे , श्रीकृष्ण शिंगणे यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत.

कधी रिलीज होणार सिनेमा?

'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील'ची निर्मिती सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलं आहे. सहनिर्माते रामदास मेदगे, विठ्ठल अर्जुन पचपिंड ,जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे पाटील, नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत. तर डॉ.सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे. १४ जून २०२४ ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतोय.  

टॅग्स :मनोज जरांगे-पाटीलमराठीमराठा आरक्षण