Join us

संग्राम साळवी थिरकणार साऊथचा तडका असलेल्या ह्या मराठमोळ्या गाण्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 11:47 AM

'अन्नाने लावला चुन्ना' असे या गाण्याचे बोल असून या गाण्याच्या मेकिंगलासुद्धा युट्यूबवर आणि सोशल मीडियावर चांगला खूप प्रतिसाद मिळाला होता.

ठळक मुद्दे 'अन्नाने लावला चुन्ना'ला प्रवीण कुंवरने दिले संगीतगाण्याचे चित्रीकरण वसईत पार पडलेसंग्राम साळवी व मयुरी शुभानंद थिरकणार गाण्यावर

'पप्पी दे पारूला' या गाण्याच्या अभूतपुर्व यशानंतर 'सुमित म्युझिक' साऊथचा तडका असलेले धम्माल गाणे घेवून येत आहे. 'अन्नाने लावला चुन्ना' असे या गाण्याचे बोल असून या गाण्याच्या मेकिंगलासुद्धा युट्यूबवर आणि सोशल मीडियावर चांगला खूप प्रतिसाद मिळाला होता. प्रसाद आप्पा तारकर यांनी या गाण्याचे दिग्दर्शन केले असून या गाण्याचे चित्रीकरण नुकतेच वसईजवळील कामण येथील मदर नेचर स्टुडिओत पार पडले.

सुमित म्युझिक प्रस्तुत 'अन्नाने लावला चुन्ना' या गाण्याला गीतकार कौतुक शिरोडकर यांनी शब्दबद्ध केले असून प्रवीण कुंवर यांनी गाण्याला संगीत दिले आहे. तर भारती मढवी यांनी आपल्या ठसकेबाज आवाजाने या गाण्याला अस्सल तडका दिला आहे. मराठीला साऊथचा तडका दिल्यामुळे हे गाणे लोकांच्या पसंतीस उतरले आहे. या गाण्यातून सगळ्यांच्या मनात घर करणाऱ्या 'देवयानी' मालिकेतील अभिनेता संग्राम साळवी तर मयुरी शुभानंद ही अभिनेत्री झळकणार असून लवकर हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राहुल शेट्ये यांनी या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. संग्रामचे हे पहिलेच लोकगीत असल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे, त्याचे चाहते त्याच्या या गाण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.          

सर्वांना नाचायला लावणारे आणि मराठीला मस्त असा साऊथचा तडका दिलेले हे गाणे हा एक नवा प्रयोग होता. कोणतेही गाणे हे जेव्हा हिट होते तेव्हा त्यामागे गायक आणि संगीतकार यांच्या सोबतच गीतकाराचा खूप मोठा सहभाग असतो. कारण जेव्हा गाण्याचे शब्द प्रेक्षकांच्या पसंतीत उतरतात आणि त्यांना भावतात तेव्हाच ते गाणे हिट होते. गीतकार संगीतकार व गायिका यांची मेहनत आणि कलाकारांचा अभिनय पाहता ‘अण्णाने लावला चुन्ना’ हे गाणे देखील प्रेक्षकांच्या पसंतीत नक्कीच उतरेल असा विश्वास होता आणि हा प्रेक्षकांनी सार्थ ठरवला. या गाण्याच्या मेकिंगला मिळालेला तुफान प्रतिसाद पाहता, हे गाणे अजूनच लोकप्रिय होईल यात शंका नाही. येत्या काळात या गाण्याचा सिक्वेल सुद्धा येणार असल्याची माहिती दिग्दर्शक प्रसाद आप्पा तारकर यांनी दिली आहे.