Join us

‘माधुरी’ सिनेमात झळकणार 'हा' नवीन चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 3:16 PM

मराठी चित्रपटाविषयी असलेली आवड जोपासत मोहसिन अख्तर निर्मित करत असलेले ‘माधुरी’ या चित्रपटाची सुंदर कथा आणि कलाकारांचा सुंदर अभिनय येत्या ३० नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांना अनुभवयाला मिळणार आहे.

नुकतेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून ‘मुंबापुरी प्रॉडक्शन’चे मोहसिन अख्तर यांनी ‘माधुरी’ या त्यांच्या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा केली होती. ‘मुंबापुरी प्रॉडक्शन’चे मोहसिन अख्तर निर्मित ‘माधुरी’ या चित्रपटात पुरस्कार विजेती अभिनेत्री सोनाली कुलकर्णी प्रमुख भूमिका साकारणार आहे. सोनाली कुलकर्णी यांनी एकापेक्षा एक अप्रतिम भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा निर्माण केली आहे, त्यामुळेच ‘माधुरी’मधील सोनाली कुलकर्णींची भूमिका पाहण्यासाठी त्यांचे चाहते नक्कीच उत्सुक असतील. एका अनमोल आणि सुंदर नात्यावर गुंफलेल्या ‘माधुरी’ चित्रपटात सोनाली कुलकर्णीसह अभिनेता शरद केळकर देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. 

हँडसम हंक असलेला शरद यावेळी मात्र कधीही न पाहिलेल्या एका नवीन रुपातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोनाली आणि शरद यांच्यासोबतीला मोठ्या पडद्यावर  प्रेक्षकांना एक नवा चेहरा पाहायला मिळणार आहे. निर्माते मोहसिन अख्तर यांनी ‘माधुरी’ या चित्रपटातून एका नव्या चेह-याला त्याचे अभिनय कौशल्य दाखवून देण्याची संधी दिली आहे आणि तो नवा चेहरा म्हणजे संहिता जोशी. विशेष म्हणजे या चित्रपटातील आणखी एका महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी संहिताची निवड करण्यात आली. 

‘माधुरी’ चित्रपटातील नवीन चेह-यासाठी संहिता जोशीची निवड करण्यासंबंधी निर्माते मोहसिन अख्तर यांनी म्हटले की, “‘माधुरी’ चित्रपटाचे लेखक शिरीष लाटकर यांनी मला एक शॉर्ट फिल्म दाखवली आणि त्या शॉर्ट फिल्ममध्ये संहिताचा परफॉर्मन्स मी पाहिला आणि तिचा अभिनय पाहता क्षणीच ठरवलं की मी संहिताची माझ्या ‘माधुरी’ चित्रपटासाठी निवड करणार. खरं तर संहिताने साकारलेली भूमिका कोणत्याही नवीन कलाकारासाठी कठीण होती पण मला विश्वास होता की संहिता ही भूमिका करु शकते. आणि आता मला खात्री आहे की संहिता ही मराठी चित्रपटसृष्टीत मोठं नाव कमवेल.”

मराठी चित्रपटाविषयी असलेली आवड जोपासत मोहसिन अख्तर निर्मित करत असलेले ‘माधुरी’ या चित्रपटाची सुंदर कथा आणि कलाकारांचा सुंदर अभिनय येत्या ३० नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांना अनुभवयाला मिळणार आहे.