Join us  

'गुलाबी साडी..' फेम संजू राठोडनं शाळेतल्या गर्लफ्रेंडमुळे पहिल्यांदा बनवलं होतं रॅप, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 4:51 PM

कलाविश्वात आपल्या मेहनतीच्या जोरावर स्थान निर्माण करणारा गायक म्हणजे संजू राठोड (Sanju Rathod). त्याच्या गाण्यांमुळे अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे.

कलाविश्वात आपल्या मेहनतीच्या जोरावर स्थान निर्माण करणारा गायक म्हणजे संजू राठोड (Sanju Rathod). त्याच्या गाण्यांमुळे अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे. त्याच्या गाण्यांनी अक्षरशः सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. त्याचे 'गुलाबी साडी' हे गाणं सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाले होते. या गाण्यावर सामान्य लोकांसह सेलिब्रेटीही थिरकले आहेत. नुकतेच एका मुलाखतीत त्याने सर्वात आधी रॅप कधी बनवलं होतं याबद्दल सांगितलं. खरेतर इयत्ता दहावीत असताना म्हणजे १६ वर्षांचा असताना पहिल्यांदा रॅप बनविले होते. 

कोणतीही कलाविश्वाची पार्श्वभूमी नसताना गायक संजू राठोडने इंडस्ट्रीत स्वतःची ओळख निर्माण केली आहे. संजू राठोडने नुकत्याच झालेल्या अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नात 'गुलाबी साडी' गाऊन संजू राठोडने वरातीत सर्वांना थिरकायला भाग पाडले. नुकतेच संजू राठोडने एबीपी माझाच्या महाकट्टामध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने त्याच्या खासगी आयुष्यासोबत इंडस्ट्रीतील प्रवासातील अनेक किस्से सांगितले.

तेव्हा केली पहिल्यांदा लिखाणाला सुरूवात

यावेळी संजूने पहिल्यांदा रॅप कधी बनवला याबद्दल सांगितले. तो म्हणाला की,  दहावी इयत्तेत असताना मला एक मुलगी आवडायची. तिने मला एक चिठ्ठी लिहिली होती. त्यामध्ये तिने शायरी लिहिली होती. ती खूप विनोदी होती. "चावल का पाणी आँगन मे फेका, मैने मेरे संजू को स्कूल मे देखा", अशी ती शायरी होती. तेव्हापासून मी दोन-चार ओळी लिहायला लागलो. तेव्हा मला इतके कळायचं नाही. तेव्हा मी फक्त १६ वर्षांचा होतो. मी तिच्या शायरीला उत्तर देताना लिहिले होते की 'फुलं है गुलाब का उसे सुखा मत देना, लडका हूं गरिब का मुझे धोका मत देना." यावेळी त्याने लिखाणाला पहिल्यांदा सुरुवात केल्याचे सांगितले.