Join us

अमेरिकेला Good bye करताना संकर्षण झाला भावूक, म्हणाला- ३६ दिवस, २१ विमान प्रवास...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2023 3:41 PM

संकर्षण  'नियम व अटी लागू' या नाटकाच्या प्रयोगासाठी अमेरिका दौऱ्यावर होता.

मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) नेहमीच त्याच्या हटके पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असतो. कधी तो बस चालवताना दिसतो तर कधी थेट विमानात पायलट सीटवर असतो. संकर्षण  'नियम व अटी लागू' या नाटकाच्या प्रयोगासाठी अमेरिका दौऱ्यावर होता. अमेरिकेत गेलेला संकर्षण सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे. सध्या त्याने लिहिलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

गेल्या अनेक दिवसांपासून अमेरिकेत असलेल्या संकर्षणने भारतात परतण्यापूर्वी तिथला आलेला अनुभव शेअर केला आहे. तसेच अमेरिकेत असलेल्या मराठी प्रेक्षकांचे देखील आभार मानलेत. 

संकर्षणची पोस्ट LOVE YOU भारत 🇮🇳 नियम व अटी लागू नाटकाचा आज अमेरिकेतला १३ प्रयोगांचा दौरा संपूर्ण झाला.. आजच्या #tampa च्या प्रयोगाला सुद्धा जोरदार प्रतिसाद मिळाला. एकुण ३६ दिवस , २१ विमान प्रवास , हजारो मैलांचं अंतर , १३ शहरं , नाटकाच्या सगळ्या प्रयोगांना मिळुन आलेले , भेटलेले , जवळपास ५००० मराठी रसिक प्रेक्षक आणि मिळालेलं अगणित प्रेम अमेरिकेच्या ह्या दौऱ्यात खूप प्रेम मिळालं. नाटक सग्गळ्या प्रेक्षकांना खूप आवडलं. प्रयोगाच्या निमित्ताने १३ वेगवेगळ्या शहरांतल्या मराठी कुटुंबांच्या घरी राहाता आलं.. त्यांनी खूप प्रेम दिलं…. काही ठिकाणी माझ्या घरच्या सारखा गणेसोत्सव होता , तर काही घरांतल्या हातची चव अगदी माझ्या आईच्या हातची.. काही ठिकाणी औक्षण करुन स्वागत झालं तर , काही ठिकाणी निरोप द्यायला सगळं कुटुंब दारात ऊभं बघून मलाही रडू आलं.. कामासाठी , नोकरीसाठी , कुटुंबासाठी आपल्या “भारतापासून” सातासमुद्रापार असलेली हि सगळी मराठी माणसं , कुटुंब त्यांच्यातली रसिकता पूरेपूर टिकवून आहेत …. हे सगळं समृद्ध करणारं आहे.. ह्या सगळ्यासाठी THANK YOU अमेरिका🇺🇸 आणि आता उद्या सुरू होणार परतीचा प्रवास आपल्या भारताकडे…🇮🇳 फार फार आठवण येतीये. आता कान आतूर झालेत ऐकायला कि , “कुछ ही समय बाद हमारा विमान मुंबई के छ. शिवाजी महाराज आंतरराष्ट्रिय हवाई अड्डे पर उतरेगा 🇮🇳 ११ oct ला पहाटे पोचतो आणि मग भेटूच🙏🏻