Join us

पायाला दुखापत झाल्यानंतर उभं राहाण्याची ताकदही नसताना या अभिनेत्याने केले नाटकाचे दोन प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 6:12 PM

या अभिनेत्यानेच सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना याविषयी सांगितले आहे.

ठळक मुद्देतू म्हणशील तसं या नाटकाच्या प्रयोगाच्या वेळेसचा हा किस्सा आहे.

संकर्षण कऱ्हाडेच्या पायाला दुखापत झाल्यानंतरही त्याने एका नाटकाचे दोन प्रयोग अगदी व्यवस्थितपणे केले होते. त्यानेच ही आठवण सोशल मीडियाद्वारे सांगितली आहे. तू म्हणशील तसं या नाटकाच्या प्रयोगाच्या वेळेसचा हा किस्सा आहे.

संकर्षणे त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे आणि त्यात सांगितले आहे की, ही घटना १ वर्ष जुनी आहे .......”  आठवण म्हणून शेअर करतोय...

#तूम्हणशीलतसं ❤️ च्या १०० व्या प्रयोगा निमित्ताने ; “आठवण क्र. ३..” “हि घटना १ वर्ष जुनी आहे...

Posted by Sankarshan Karhade on Thursday, March 25, 2021

तारीख २० जानेवारी २०२०.... वाशीचा प्रयोग.  नाटक ओपन होऊन बरोब्बर महिना झाला होता.  आमच्या नाटकामध्ये धावपळ थोडी जास्त आहे. माझं पात्रं अवखळ असल्यामुळे काही मुव्हमेंट्स आमचा दिग्दर्शक प्रसाद दादाने (प्रसाद ओक) जरा जलद दिल्या आहेत.  त्यातली एक टेबलावर उडी मारायची मुव्हमेंट करताना माझा  पाय स्टेजवर मुरगळला आणि स्वत:ला सावरून मी उठेपर्यंतच; टेनिसचा बाॅल पायाच्या घोट्यात ठेवलाय की काय... असं वाटावं इतका पाय सुजला... अगदी काही क्षणांत... तो प्रयोग तसाच थोडा लंगडत केला.  

रात्री पुण्यात आलो कारण दुसऱ्या दिवशी दुपारी १२.३० आणि संध्याकाळी ५.३० असे दोन प्रयोग  होते.  मग मी रात्रीच १२.३० वाजता पुण्यातील संचेती हाॅस्पिटलला गेलो. डाॅक्टरांनी एक्स रे काढला. “हेअर लाईन क्रॅक, स्वेलींग, रेस्ट , ऑपरेट, प्लास्टर..” या सगळ्या शब्दांचा वापर करून ते भलं मोठं काहीतरी सांगत होते... मी डायरेक्ट एवढंच विचारलं , उद्या दोन प्रयोग करता येतील असं काहीतरी सांगा. त्यांनी दिलेल्या गोळ्या घेऊन रात्री झोपलो आणि सकाळी पलंगाच्या खाली पायच ठेवता आला नाही. मला घाम फुटला. थिएटरला जाण्याआधी परत गोळ्या घेतल्या आणि प्रयोग सुरू केला. त्या उडीच्या मुव्हमेंटला जिथे मला काल लागलं होतं... आज  सगळे बॅकस्टेज आर्टिस्टसुद्धा विंगेत येऊन थांबले होते. पण, दोन्ही प्रयोग सुरळीत आणि मस्त झाले.  नंतर काही दिवसांची गॅप होती. आराम केल्यावर सूज पण गेली आणि पाय दुखला पण नाही.

टॅग्स :मराठी