Join us

संस्कृती बालगुडेच्या ब्लॅक शिमर ड्रेसमधल्या घायाळ करणाऱ्या अदा, फॅन्स झाले क्रेझी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 15:28 IST

नव्या फोटोशूटमधील संस्कृतीचा हा फोटो कुणालाही क्लीन बोल्ड करेल असाच आहे.

आपल्या अभिनयाबरोबर आपल्या लूक्समुळे रसिकांची मनं जिंकलेली अभिनेत्री संस्कृती बालगुडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. चर्चेत येण्यास कारणीभूत ठरला आहे तिचा हा फोटो. तिच्या या फोटोंमधील मादक अदा कुणालाही अक्षरक्ष: वेड लावतील अशाच आहेत. सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारणारी संस्कृती सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. नेहमीच आपल्या या हॉट फोटोंच्या माध्यमातून तिने रसिकांच्या काळजाचा ठाव घेते.याच फोटोंच्या यादीत संस्कृतीच्या आणखी एका नव्या फोटोची भर पडली आहे.

नव्या फोटोशूटमधील संस्कृतीचा हा फोटो कुणालाही क्लीन बोल्ड करेल असाच आहे. ब्लॅक शिमर रंगाच्या ड्रेसमध्ये तिच्या सौंदर्याला चार चाँद लागले आहेत. यात तिने विविध पोज दिल्याचे पाहायला मिळत आहे. तिच्या या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.  फॅन्सना ब्लॅक ड्रेसमधला तिचा हा लकू आवडला आहे. तिचे  सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे. 'सांगतो ऐका' या सिनेमानंतर निवडुंग, शिव्या, एफयु असे संस्कृतीचे विविध सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकले आहेत. आगामी काळात भारंभार सिनेमा स्वीकारायचे नसून सिलेक्टिव्ह राहण्याचा संस्कृतीने निर्धार केला आहे.

 

बऱ्याचदा संस्कृतीला सोशल मीडियावर तिच्या रिलेशनशिप स्टेटसबाबत विचारणा होत असते. नुकतंच सोशल मीडियावरील एका पोस्टमधून संस्कृतीने तिच्या रिलेशनशिप स्टेट्सचा गंमतीशीरपणे उलगडा केला आहे. तिने एका कुत्र्याचा   फोटो शेअर केला आहे. हा कुत्रा म्हणजे चॉव-चॉव नावाच्या चायनीय केसाळ कुत्र्याची एक जात. त्यासोबत एक पोस्टही तिने लिहिली आहे. “अनेकांना प्रश्न पडला होता की मी रिलेशनशिपमध्ये आहे का?, कुणाला डेट करते आहे? तर याचं उत्तर आहे हे… हाच तो ज्याला मी डेट करत आहे. हाच माझा एकमेव बॉयफ्रेंड.” यांत तिने अभिनेत्री नेहा पेंडसे हिलाही टॅग केलं आहे. कारण नेहानेही अशाच कुत्र्यासोबतच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. संस्कृतीच्या या पोस्टमुळे ती अजूनही सिंगल असल्याचे स्पष्ट झालं असून अनेक तरुणांचा जीव भांड्यात पडला असेल. 

टॅग्स :संस्कृती बालगुडे