Join us

'...म्हणून तुम्ही महाराजांचे मावळे होत नाही', जात अन् धर्म भेदभावाबद्दल काय म्हणाला संतोष जुवेकर ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 4:14 PM

संतोष जुवेकर हा मराठी कलाविश्वातील राऊडी अभिनेता आहे.

संतोष जुवेकर हा मराठी कलाविश्वातील राऊडी अभिनेता आहे. मोरया, झेंडा या सिनेमांतून घराघरात पोहोचलेल्या संतोषने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनंही जिंकली. संतोषचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे.  त्याने मराठीसह हिंदी सिनेमे आणि वेब सीरिजमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. नुकतंच संतोषनं ईसापनीती या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी त्याने जात आणि धर्म भेदभावांबद्दल भाष्य केलं. 

जात आणि धर्म भेदभावांबद्दल बोलताना संतोष म्हणाला, 'मी जर एखाद्या मुस्लिम मित्राच्या घरी गेलो आणि त्याला पुरणपोळी मागितली तर तो देईल. जर तो माझ्या घरी आला आणि त्याने बिरयानी मागितली तर मीही ती देईल. जर एखाद्या कॅथलिक मित्राच्या घरी गेले आणि त्याला साबुदाण्याची लापशी मागितली तर माझ्यासाठी ती बनवेल. जर तो माझ्याघरी आला तर त्याच्यासाठी मी केक बनवेल. मला वाटतं की जात धर्म सोडायला पाहिजे. महाराजांसारखी दाढी ठेवली, चंद्रकोर काढली आणि कानात भिकबाळी घातली म्हणजे तुम्ही महाराजांचे मावळे नाही होत. त्यासाठी त्यांचे विचार घ्या'. संतोषची ही मुलाखत सध्या चर्चेत आहे. 

संतोष जुवेकरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो लक्ष्मण उतेकर यांचं दिग्दर्शन असलेल्या 'छावा' सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  या सिनेमात विकी कौशल संभाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार असून रश्मिका मंदाना येसूबाईंच्या भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय, टेलिव्हीजनवरील लोकप्रिय 'इंद्रायणी' मालिकेत  संतोष जुवेकरची एन्ट्री झाली आहे. या मालिकेत पाठिराखा ही भूमिका संतोष जुवेकर साकारत आहे. 

टॅग्स :संतोष जुवेकरछत्रपती शिवाजी महाराजसेलिब्रिटी