Join us  

​‘सैराट’ची मुळ प्रिंट लीक- नागराजची पोलिसात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2016 1:48 PM

दिग्दर्शक नागराज मंजुळेचा बहुचर्चित ‘सैराट’ चित्रपटाची मुळ प्रिंट प्रदर्शनापूर्वीच लीक झाल्याचं समजतय. याप्रकरणी नागराज मंजुळे यांनी पोलिसात तक्रार दिली ...

दिग्दर्शक नागराज मंजुळेचा बहुचर्चित ‘सैराट’ चित्रपटाची मुळ प्रिंट प्रदर्शनापूर्वीच लीक झाल्याचं समजतय. याप्रकरणी नागराज मंजुळे यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. मंजुळे यांना ह्या लीक प्रकरणाची माहिती समजताच त्यांनी वांद्रे येथील सायबर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. सैराट ची ३ जीबीची मूळ प्रिंट सध्या मोबाईलवर व्हायरल झाल्याचे नागराजच्या लक्षात आल्याने त्याने तक्रार दाखल केली. दोन प्रेमी जीवांच्या उत्कट प्रेमाची कहाणी असलेला ‘सैराट’ ने बॉक्स आॅफिसवर तब्बल १२ कोटी १० लाखाची रेकॉर्डब्रेक कमाई के ली आहे. दरम्यान हा या वर्षातील लीक झालेला दुसरा मराठी चित्रपट चित्रपट आहे. याआधी नाना पाटेकरचा नटसम्राट लीक झाला होता. नटसम्राटच्या निर्मात्यांनी सुद्धा पोलिसात तक्रार दाखल केली होती.