सैराटने आता राजकीय कार्यकर्त्यांनाही लावलय याड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2016 10:32 AM
संपूर्ण भारतासह विदेशातही लोकांना सैराटने याड लावल्याने आता या चित्रपटाच्या डायलॉगने राजकीय कार्यकर्त्यांनाही याड लावल्याचं चित्र दिसत आहे. राज्यात ...
संपूर्ण भारतासह विदेशातही लोकांना सैराटने याड लावल्याने आता या चित्रपटाच्या डायलॉगने राजकीय कार्यकर्त्यांनाही याड लावल्याचं चित्र दिसत आहे. राज्यात शिवसेना-भाजप युतीत काही तेड निर्माण झाल्याचं वातावरण निर्माण झालं आहे. यावरुन कार्यकर्त्यांनी हे राजकीय चित्र सैराट चित्रपटातील डायलॉगच्या माध्यमातून रंगवण्यास सुरूवात केली आहे.व्हॉटसअॅपवर शिवसेनेला आर्ची आणि परश्याला भाजप म्हणून, सैराटमधील खो-खो डायलॉग लिहिलाय, राजकीय भाषेत लिहिलेला हा डायलॉग, व्हॉटस अॅपवर व्हायरल होतोय आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीचे वर्णन या डायलॉगच्या माध्यमातून होताना दिसत आहे. वाचा, सैराट आणि युतीशिवसेना : काय बघतो रंभाजप : कुठे काय? शासन बघतोयशिवसेना : शासन? मगास पासून डॉळॅ वासुन बघतोय की माज्याकडंभाजपा : तुला कसं कळलं तुज्याकडे बघतोय ते..शिवसेना : मी माज्या डोळ्यांनी पायलं..भाजपा : तूच कशाला बगती मग, तूच नको बगू की...शिवसेना : मी बगिन नाय तर काय पन करीन...भाजप : मग मी पन बगिन नाय त काय पैन करीन.. तुला नसल आवडत तर तू नको बगू की.शिवसेना : मी कुटे म्हटलं माल्नाय आवडत.. (मुझिक ढॅ ढॅ ढॅ....)भाजपा : :)(मागून राष्ट्रवादी : अरे भाजपा लेका, तुला कळलं का लगा ती काय बोल्ली, अरे ती जे बोल्ली ते म्हणजे तिला युती पायजे लेका.)