Join us

सौरभ गोखलेने का मानले मित्राचे आभार?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2016 10:46 AM

प्रत्येक कलाकारासाठी रंगभूमी हा जिव्हाळ्याचा विषय असतो. कारण प्रत्येक कलाकार हा रंगभूमीवरूनच घडत असतो. रंगभूमीनेच त्या कलाकारांना मोठे केलेले ...

प्रत्येक कलाकारासाठी रंगभूमी हा जिव्हाळ्याचा विषय असतो. कारण प्रत्येक कलाकार हा रंगभूमीवरूनच घडत असतो. रंगभूमीनेच त्या कलाकारांना मोठे केलेले असते. त्यामुळे कलाकारांसाठी रंगभूमी ही सर्वकाही असते. त्यामुळे आज ही कित्येक मोठे कलाकार चित्रपट आणि रंगभूमी दोन्ही गाजवत असल्याचे पाहायला मिळत आहेत. तसेच काही नवोदित कलाकारदेखील मालिका आणि नाटक दोन्हीं सांभाळाताना पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे ज्या रंगभूमीसाठी कलाकार झटत असतात त्या नाटयगृहांची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते. तसेच नाटयगृह हे कशापध्दतीने शेवटचा श्वास घेत आहेत याचा व्हिडीओदेखील मध्यंतरी अभिनेता सुमित राघवन याने सोशलमीडियावर शेअर केला होता. आता अशा परिस्थितीत कोणी नवीन नाटयगृह उभारत असेल तर कलाकारांसाठी ती आनंदाचीच गोष्ट आहे. आता हेच पाहा ना, नवोदित कलाकारांच्या कलेला वाव मिळावा म्हणून अभिनेता सौरभ गोखलेचा मित्र एका संस्थेसोबत नवीन नाटयृह उभारत आहे. म्हणून सौरभने त्याचे विशेष आभार मानत असल्याचे सोशमीडियावर पाहायला मिळत आहे. त्याने आपल्या या मित्रांसोबतचा एक फोटो सोशलमीडियावर अपलोड केला आहे. तसेच तो आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगतो, ज्या थिएटर अकॅडमी नि अनेक गुणवंत कलाकार उभे केले तीच संस्था आता महाराष्ट्र मंडळाबरोबर नवोदित कलाकारांसाठी एक अप्रतिम सुसज्ज थिएटर बांधत आहे.. अकॅडमी चा मी एक शिष्य.. अभिनयाची गोडी वाढली आणि शिक्षण सुरु झालं ते इथून... नवी उभी रहाणारी जागा बघून आणि आकार घेणारं स्टेज बघून खरंच खूप अभिमान वाटतो.. या संकल्पनेचा खराखुरा शिल्पकार ज्यानी पूर्ण निस्वार्थी भावनेतून त्याचं स्वप्न सत्यात उतरवलं त्या प्रसाद पुंरंदरे या माज्या मित्राला खूप खूप शुभेच्छा आणि आम्हा सर्व छोट्या कलाकारांकडून त्यांचे शतश: आभार !!!