Join us

सावनी रविंद्रचे नवं गाणं रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2018 10:13 AM

सावनी रविंद्रने फिल्म प्लेबॅक सिंगींगसोबतच मॅशअपच्या दुनियेतही आपला ठसा उमटवला आहे. तिच्या मॅशअप्सना नेहमीच तिच्या चाहत्यांनी भरभरून प्रेम दिलंय. ...

सावनी रविंद्रने फिल्म प्लेबॅक सिंगींगसोबतच मॅशअपच्या दुनियेतही आपला ठसा उमटवला आहे. तिच्या मॅशअप्सना नेहमीच तिच्या चाहत्यांनी भरभरून प्रेम दिलंय. त्यामूळेच आता सावनी आपलं ‘टिक-टिक वाजते – पियु बोले’ हे मॅशअप घेऊन आलीय. संगीतकार गौरव डगावकरसोबत सावनीने हे मॅशअप गायलंय.सावनी आणि गौरव ह्याअगोदर वन वे तिकीट चित्रपटातल्या ‘मस्त मलंगा’ गाण्यासाठी एकत्र आले होते. ह्या गाण्यावर चाहत्यांच्या प्रेमासोबतच पुरस्कारांचीही बरसात झाली होती. सावनी आपल्या नव्या मॅशअपविषी सांगते, “गौरव भेटला की आमची नेहमीच जॅमिंग सेशन रंगतात. अशाच एका जॅमिंगसेशन दरम्यान हे गाणं आकाराला आलं. गौरव टिकटिक वाजते गात होता. आणि मी पियु बोले गाऊ लागले. आणि मॅशअप रंगलं. मग आम्ही हे मॅशअप रेकॉर्ड करायचे ठरवले. गौरव आणि माझं हे पहिलं मॅशअप आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे, कानसेनांना हे मॅशअप खूप आवडेल.”साँगफेस्ट इंडिया निर्मित ह्या गाण्याचं चित्रीकरण कर्जतच्या तन्मय फार्म्समध्ये झाले आहे. बॉलिवूडचे सुप्रसिध्द अरेंजर दिपजंन गुहा ह्यांनी म्युझिक अरेंजमेंट केली असून शशांक आचार्यने बासरी वाजवली आहे तर सागर मोंडलने कझोन बॉक्स प्ले केला आहे.काही दिवसांपूर्वीच सावनी लग्नाच्या बेडीत अडकली आहे. आपल्या सुरेख आवाजाने गायिका सावनी रविंद्र हिने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. तिने मराठी चित्रपटसृष्टीत एक से एक गाणी गायिली आहेत. तिच्या प्रत्येक गाण्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. सावनी ही खूप चांगली गायिका म्हणून आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहे. शास्त्रीय संगीताचा भक्कम पाया आणि पाश्चिमात्य संगीताची उत्तम समज असे कमालीचा कॉम्बो सावनीच्या आवाजात आपल्याला ऐकायला मिळतो. सावनीने तामिळ इंडस्ट्रीमध्ये देखील खूप गाणी गायली आहेत. काही दिवसांपूर्वी तिचे वेन्निलविन सालईगलिल हे गाणे प्रदर्शित झाले आहे. तिच्या या गाण्याला सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात लाइक्स मिळताना दिसत आहे.