सयाजी शिंदे (Sayaji Shinde) हे मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू आणि हिंदी भाषेतील अनेक चित्रपटात अभिनय केला आहे. यासोबतच पर्यावरण रक्षणार्थ त्यांचे भरीव योगदान असून त्यांनी सह्याद्री देवराई या संस्थेमार्फत वृक्षा रोपणाचे अभियान सुरु केले आहे. दरम्यान अलिकडेच त्यांनी लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी झाडे लावण्याच्या उपक्रमाबद्दल सांगितले.
सयाजी शिंदे यांनी सह्याद्री देवराई या संस्थेमार्फत अनेक वृक्षारोपणाचे कार्यक्रम केले आहेत. या उपक्रमाची कल्पना कशी सुचली, याबद्दल त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, ती कल्पना मला सुचली की आई जर आयुष्यातून जायची नसेल तर काय करता येईल याच्यावर मी खूप विचार करायचो. पैसे दिले हे दिले तरी हे वय थांबवता येत नाही ना आणि खूप अन्न आहे म्हणून पचन यंत्रणा चांगली आणू शकत नाही ना. आई नेहमी म्हणायची आरं अन्न दुसऱ्याचं आहे पॉट दुसऱ्याचं आहे का? आणि त्यामुळे आपल्या पोटाला लागेल तेवढंच खायला लागलं ना. काही देऊन काय उपयोग आहे त्याचा इतक्या साध्या साध्या गोष्टी सगळे जीवन भरलं होतं.