या सिनेमात दिसणार सयाजी शिंदे सनई वादकाच्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2018 7:49 AM
निर्माते अमोल ज्ञानेश्वर काळे यांच्या शार्दूल फिल्म्स अँड एंटरटेन्मेंटची निर्मिती असलेल्या रवी जाधव फिल्म्स प्रस्तुत,दिग्दर्शक समीर आशा पाटील दिग्दर्शित ...
निर्माते अमोल ज्ञानेश्वर काळे यांच्या शार्दूल फिल्म्स अँड एंटरटेन्मेंटची निर्मिती असलेल्या रवी जाधव फिल्म्स प्रस्तुत,दिग्दर्शक समीर आशा पाटील दिग्दर्शित 'यंटम' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला.सोशल मीडियात ट्रेलर पोस्ट केल्यानंतर तो अवघ्या काही वेळातच ट्रेंडही झाला.या चित्रपटातून अभिनेते सयाजी शिंदे सनई वादकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.आजवर अनेक मराठी,हिंदी तसेच दाक्षिणात्य चित्रपट मी केले.नेहमीच कलाकाराला वेगवेगळ्या भूमिका करण्याची इच्छा असते अगदी त्याचप्रकारे ही भूमिका मला ऑफर झाली आणि ही संधी मी स्विकारली असे अभिनेते सयाजी शिंदे यांनी सांगितले.या चित्रपटात वैभव कदम आणि अपूर्वा शेळगावकर ही नवी जोडी पहायला मिळणार आहे.तर अभिनेते सयाजी शिंदे सनई वादकाच्या भूमिकेत दिसणार आहे.'सनई बोलत नाही,ती थेट काळजाला भिडते' असे प्रभावी संवाद ही या चित्रपटाची ताकद आहे. ट्रेलरवरून या चित्रपटात एक हळवी मनाला भिडणारी प्रेमकथा पहायला मिळणार असल्याचं दिसत आहे.सोशल मीडियात या ट्रेलरला प्रचंड प्रतिसादही मिळत आहे.समीरसह मेहुल अघजा यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे.गीतकार मंगेश कांगणे यांचे गीतलेखन असून चिनार-महेश यांचे उत्तम संगीत लाभले आहे.हर्षवर्धन वावरे,योगेश रणमले,आनंदी जोशी,छगन चौगुले यांच्या सुमधुर आवाजात या चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत.येत्या २ फेब्रुवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.Also Read:रवी जाधवनं दर्शवला यंटम मराठी सिनेमाला पाठिंबा,या दिग्गज अभिनेत्यामुळे आनंदाला उरला नाही पारावार'यंटम' ही पौगंडावस्थेतील लव्हस्टोरी आहे.ग्रामीण भागाच्या बॅकड्रॉपवर रंगणारी यंटम ही लव्हस्टोरी आहे.यांत 'यंटम' म्हणजे वेडेपण पाहायला मिळेल असं रवी जाधवला वाटतं.प्रेमासाठी वाट्टेल ती करण्याची तयारी या कथेतील नायक-नायिकांमध्ये पाहायला मिळेल.'यंटम' हा एक वेगळा सिनेमा ठरेल असा विश्वास रवी जाधवला वाटतो आहे. रवी जाधवने कायमच तरुण दिग्दर्शकांना पाठिंबा दर्शवला आहे.'रेगे' सिनेमाचा दिग्दर्शक अभिजीत पानसे,'कॉफी आणि बरंच काही' सिनेमाचे दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांनाही रवी जाधवने संधी दिली होती.