Join us

सयाजी शिंदेंची या तमीळ सिनेमात कमल हसन यांच्या जागी लागली होती वर्णी, घेतले होते फक्त ५ लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 16:49 IST

Sayaji Shinde : नुकतेच सयाजी शिंदे यांनी लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांच्या पहिल्या तमीळ सिनेमातील मानधनाबद्दल सांगितले. या चित्रपटात त्यांची कमल हसन यांच्या जागी वर्णी लागली होती.

अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी आपल्या सकस कलाकृतींनी आणि अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनावर राज्य गाजविले आहे. त्यांनी फक्त मराठी, हिंदीच नाही तर साउथ सिनेइंडस्ट्रीतही आपले स्थान निर्माण केलंय. दरम्यान नुकतेच सयाजी शिंदे यांनी लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांच्या पहिल्या तमीळ सिनेमातील मानधनाबद्दल सांगितले. या चित्रपटात त्यांची कमल हसन (Kamal Hassan) यांच्या जागी वर्णी लागली होती.

सयाजी शिंदे यांनी लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या सिनेकारकीर्दीशिवाय खासगी आयुष्यातील बरेच किस्से सांगितले आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या तमीळ सिनेमा आणि मानधनावर भाष्य केले. ते म्हणाले की, ''मला पहिली तमीळ फिल्म ऑफर झाली. ती फिल्म कमल हसन यांना करायची होती आणि मला सांगितलं की तुम्हाला पाच लाख रुपये देऊ आम्ही या फिल्मचे. मी म्हटलं मी पन्नास हजारात करायला तयार आहे. अशी भूमिका कोण सोडेल. म्हटलं काय भूमिका आहे. ज्याच्यासाठी आपण वाट बघत होतो इतका भारी रोल आहे आणि इथे पैशांचा विषय येत नाही.''

ते पुढे म्हणाले की,''नंतर मला कळलं की अरे बापरे कमल हसन यांनी किती लाखो करोडो घेतले असते. मला तर लगेच बरं वाटलं कारण मला पाच लाखच लय मोठे वाटले होते. त्यामुळे इथलाच गेम आहे ना.

इथं तुमच्याकडे सायकल आहे आणि तुम्हाला मोटरसायकल मिळेल तर तुम्हाला भारीच वाटणार. तुमच्याकडे लिमोजिन आहे तर तुम्हाला हेलिकॉप्टर घ्यावसं वाटणार शेवटी मनाचाच खेळ आहे ना अशी ती गंमत आहे.'' 

टॅग्स :सयाजी शिंदेकमल हासन