'सैराट'ची इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 1:08 AM
'सैराट'ची बर्लिनच्या 66व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड'फँड्री' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटानंतर प्रदर्शनापूर्वीच त्याच्या आगामी 'सैराट' या चित्रकलाकृतीची ...
'सैराट'ची बर्लिनच्या 66व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड'फँड्री' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटानंतर प्रदर्शनापूर्वीच त्याच्या आगामी 'सैराट' या चित्रकलाकृतीची निवड बर्लिन येथे होणार्या 66व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी झाली आहे. पदार्पणातील चित्रपटावर राष्ट्रीय पुरस्काराची मोहोर उमटल्यामुळे एक दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांच्या नागराज मंजुळे यांच्याकडून अपेक्षा नक्कीच वाढल्या आहेत.काही प्रमाणात 'फँडी'च्या विषयाशी मिळताजुळता असलेल्या 'सैराट'मध्ये ग्रामीण भागात राहणार्या चार व्यक्तींची प्रेमकथा दाखविण्यात आली आहे. दिग्दर्शन, प्रॉडकशन, कथा आणि पटकथा सर्वच काही नागराज मंजुळे असलेला असा हा चित्रपट आहे. ग्रामीण भागातील सामाजिक प्रश्नांवर देखील हा चित्रपट भाष्य करतो. चार तरुणाईच्या गटाची ही कथा असून, जे फिअरलेस आणि केअरफ्री आयुष्य जगत आहेत. ग्रामीण जीवन हा या चित्रपटाचा गाभा आहे.