Join us

पाहा कसा असणार आहे, नगरसेवक एक नायक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2017 7:25 AM

सध्या निवडणुकीचे वारे जोरात वाहताहेत. कोणाची सत्ता येणार? आणि कोण बाजी मारणार? यात चुरस पहायला मिळतेय. लोकशाही ही लोकहिताची ...

सध्या निवडणुकीचे वारे जोरात वाहताहेत. कोणाची सत्ता येणार? आणि कोण बाजी मारणार? यात चुरस पहायला मिळतेय. लोकशाही ही लोकहिताची न राहता ती जेव्हा सत्ताधीशांच्या हिताची ठरते. तेव्हा त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी याच लोकांमधला एक नायक पुढे यावा लागतो... तो म्हणजे नगरसेवक. राजकारण व समाजकारणाच्या तराजूत जनतेचे हित जपणारा नगरसेवक फार कमी वेळा चित्रपटाच्या कथांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आला. याच धर्तीवर जश पिक्चर्स प्रस्तुत आगामी नगरसेवक एक नायक हा नवा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.                        शशिकांत चौधरी व जयश्री चौधरी निर्मित नगरसेवक या चित्रपटाचे दिग्दर्शन दिपक कदम यांनी केलंय. नगरसेवक या चित्रपटात अन्याय व अत्याचाराविरोधात आवाज उठविणाºया मल्हार या तरुणाची कथा पहायला मिळणार आहे. मुंबईत नव्याने दाखल झालेल्या मल्हारचा अनपेक्षितपणे राजकारण्याशी संबंध येतो. पुढे अशा काही घटना घडतात की तोच निवडणुकीच्या रिंगणात उभा राहतो. व्यावसायिक धाटणीच्या या चित्रपटाची कथा बिपीन धायगुडे यांनी लिहिली आहे. पटकथा बिपीन धायगुडे व अभिजित कुलकर्णी यांनी लिहिली असून संवाद त्यांच्यासोबत योगेश माकंर्डे यांनी लिहिलेत. त्रिलोकी चौधरी यांनी छायांकन केले असून संकलन सुबोध नारकर तर कला दिग्दर्शन मधु कांबळे यांनी केले आहे.                     उपेंद्र लिमये, नेहा पेंडसे, सयाजी शिंदे, गणेश यादव, विनय आपटे, सतीश तारे, सुनील तावडे, संजय खापरे, विजय निकम, श्याम ठोंबरे, सविता मालपेकर, त्रियोग मंत्री, प्रियांका नागरे,अभिजीत कुलकर्णी, अशोक पावडे, यश कदम, वर्षा दांदळे, मयुरी देशमुख या कलाकारांच्या अभिनयातून साकारलेला नगरसेवक हा चित्रपच लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.