सुजय डहाके (Sujay Dahake) दिग्दर्शित शाळा (Shala) चित्रपट सुपरहिट झाला होता. शालेय जीवनातील मुलांच्या मनाची घालमेल पडद्यावर दाखवणाऱ्या या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली होती. या चित्रपटातील बालकलाकार तुम्हाला आठवत असतील ना. केतकी माटेगावकर, अशंमुन जोशी यांनी या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारल्या होत्या. तर मुकुंदचा खास मित्र सुर्याची भूमिका केतन पवार (Ketan Pawar) याने साकारली होती. या चित्रपटामुळे केतन पवारला खूप प्रसिद्धी मिळाली होती. नुकताच केतन पवारने लग्नगाठ बांधली आहे. त्याच्या लग्नाचे फोटो नुकतेच समोर आले आहेत.
अभिनेता केतन पवार मंगळवारी (२६ एप्रिल) त्याची खास मैत्रिण प्राचीसोबत लग्नबंधनात अडकला. या लग्न सोहळ्याला त्याच्या जवळच्या मित्रमंडळींनी तसेच नातेवाईकांनी हजेरी लावली होती. लग्नाचे काही खास फोटो केतनने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
‘बहू असोत सुंदर संपन्न..’ हे गाणं काही कलाकारांनी एकत्र येऊन नव्या रुपात सादरीकरण केलं होतं त्यात केतन पवारने देखील महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. सुखन, आम्ही दुनियेचे राजे या कार्यक्रमाचे तो सादरीकरण करताना दिसतो.