सुजय डहाके दिग्दर्शित ‘शाळा’ (Shala ) या चित्रपटानं मराठी चित्रपटसृष्टीत धुमाकूळ घातला होता. शालेय जीवनात कोवळ्या बालकांच्या मनातील घालमेल पडद्यावर दाखवणा-या या सिनेमानं राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरलं. आंतरराष्ट्रीय पातळीवरही या सिनेमानं एक नवा अध्याय लिहिला. या सिनेमातील दोन बालकलाकार तुम्हाला आठवत असतीलच. होय, केतकी माटेगावकर आणि अशंमुन जोशी (Anshuman Joshi). या सिनेमात अंशुमनने मुकुंद जोशीची भूमिका साकारली होती. त्याने साकारलेला मुकुंद आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. हा मुकुंद आता कसा दिसतो, तुम्ही पाहिलेय? तर लय भारी.
होय, मुकुंद साकारणारा अंशुमन जोशी आता खूपच हँडसम दिसतो. आज त्याचे फोटो पाहून हाच तो मुकुंद का? असा प्रश्न तुम्हालाही पडल्याशिवाय राहणार नाही.
‘शाळा’ या सिनेमानंतर केतकी माटेगावकर अनेक सिनेमात दिसली. पण अशंमन मात्र काही मोजक्या सिनेमात झळकला. म्हैस, फुंतरू,फास्टर फेणे असे काही सिनेमे त्यानं केले.
फोटोकॉपी या सिनेमातही तो झळकला. इरफान खान, मिथिला पालकर, दलकीर सलमान स्टारर ‘कारवां’ या हिंदी सिनेमातही त्याला संधी मिळाली. अंशुमनने मराठी नाटकातही काम केलं आहे.
आता अंशुमन केवळ अभिनेता नाही तर दिग्दर्शक, लेखक, चिंतक, चित्रलेखक, छायाचित्रकार अशा वेगवेगळ्या भूमिका साकारतो आहे. फोटोग्राफीची त्याला विशेष आवड आहे. त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर त्याने कॅमे-यात कैद केलेले अनेक सुंदर फोटो पाहायला मिळतात.मिलिंद बोकिल यांच्या ‘शाळा’ या कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे. सुजय डहाके दिग्दर्शित ‘शाळा’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळाला होता. दमदार अभिनयासाठी अंशुमनलाही पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.