'मैं परेशान', 'बलम पिचकारी', अगं बाई हल्ला मचाये रे', 'चढी मुझे यारी तेरी ऐसी जैसे दारू देसी' या आणि अशा अनेक बॉलिवूड साॅग्सवर सगळ्यांना ठेका धरायला लावणारा शाल्मलीचा आवाज आता आपल्याला मराठीत सुद्धा ऐकायला मिळतोय. भावेश काशियानी फिल्म्स,आयड्रिम्झ फिल्मक्राफ्ट प्रस्तुत 'कॉलेज डायरी' या मराठी चित्रपटात शाल्मलीने एक खास रोमँटिक गाणं गायलंय जे तुफान गाजतंय. केवळ दोनच दिवसांत फेसबुक आणि यूट्युबवर लाखांत मिळणारे लाईक्स आणि व्ह्युज् ने अनिकेत जगन्नाथ घाडगे दिग्दर्शित 'कॉलेज डायरी' चित्रपटाची क्रेझ आणखी वाढली आहे.
कॉलेजच्या मयूरपंखी दिवसांच्या आठवणी पुनुरुज्जीवत करणाऱ्या 'कॉलेज डायरी'ची कथा अनिकेत जगन्नाथ घाडगे यांनी लिहिली असून संवाद सुद्धा त्यांचेच आहेत. चित्रपटाचे कार्यकारी निर्माते सचिन दूबाले पाटील असून या चित्रपटात विशाल सांगळे, आनंद बुरड, समीर सकपाळ, वैष्णवी शिंदे, शरद जाधव, प्रतीक्षा शिवणकर, अविनाश खेडेकर, प्रतीक गंधे, हेमलता रघू, जनार्दन कदम, शिवराज चव्हाण,शुभम राऊत,आदींच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. मन प्रसन्न करणारा 'कॉलेज डायरी' १६ फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.