९० च्या दशकातील असे काही चेहरे होते जे काही काळ पडद्यावर चमकले पण नंतर गायब झाले. असाच एक चेहरा होता सिद्धार्थ रे (Siddharth Ray), ज्याला तुम्ही नावाने ओळखत नसाल, पण फोटो पाहून तुमच्या आठवणीही ताज्या होतील. सिद्धार्थ रेला अशी ही बनवा बनवी चित्रपटातील शंतनूच्या भूमिकेनं खूप लोकप्रियता दिली. त्याची मराठी चित्रपटांमध्ये जास्त लोकप्रियता असली तरी त्याला बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली ती बाजीगर या चित्रपटातून. ज्यामध्ये तो काजोल आणि शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसला होता.
मराठी चित्रपटांमध्ये काम करून नाव कमावल्यानंतर सिद्धार्थ रेने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. तो गंगा का वचन, वंश, पेहचान, खून का सिंदूर यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसला पण बाजिगर या चित्रपटातून त्याला प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटात त्याने एका पोलिसाची भूमिका केली होती. जताना भी नहीं आता, बताना भी नहीं आता... हे या चित्रपटातील गाणे त्यांच्यावर चित्रित झाले होते, जे आजही हिट आहे. मात्र बाजीगरनंतर तो चित्रपटसृष्टीपासून दुरावला आणि अनेक वर्षे पडद्यापासून दूर होता.
२००० मध्ये त्यांनी बिछू, पिता आणि जानी दुश्मन या चित्रपटांमध्येही काम केले. पण २००४ साली त्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यावेळी तो फक्त ४० वर्षांचा होता.
आज सिद्धार्थ रेचा मुलगा चित्रपटांमध्ये नाव कमावत आहे. सिद्धार्थ रेचा मुलगा शिष्य याला बॉलिवूडमध्ये लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रात काहीतरी करण्याची इच्छा आहे. त्याला पडद्यासमोर काम करायचे नाही तर पडद्यामागे काम करायचे आहे.