Join us

बाप-लेक एकाच सिनेमात! शरद पोंक्षेच्या लेकाचं सिनेसृष्टीत पदार्पण, केली मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 13:54 IST

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते शरद पोंक्षेच्या लेकाची सिनेसृष्टीत एन्ट्री झालीय. लेकाच्या सिनेमात शरद करणार अभिनय

शरद पोंक्षे हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते. शरद यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वात सुद्धा ठसा उमटवला आहे. शरद कायमच त्यांच्या कुटुंबाबद्दल सोशल मीडियावर माहिती शेअर करत असतात. शरद पोंक्षेंची लेक पायलट आहे, हे आपल्याला माहितच आहे. आता शरद पोंक्षेंचा मुलगा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मनोरंजन विश्वात पदार्पण करतोय.

शरद पोंक्षेंचा मुलगा स्नेह आता मनोरंजन विश्वात पदार्पण करत आहे. स्नेह एका आगामी सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. आणि विशेष गोष्ट म्हणजे या सिनेमात शरद पोंक्षे विशेष भूमिकेत दिसणार आहेत. शरद आणि स्नेह यांनी आज सिद्धिविनायकाचा आशिर्वाद घेत ही मोठी घोषणा केली. शरद - स्नेह या बापलेकाच्या जोडीने मुंंबईतील सिद्धिविनायक गणपतीचं मनोभावे दर्शन घेतलं.

'प्रॉडक्शन नंबर १' असं या सिनेमाचं सध्या नाव असून वी. एस . प्रॉडक्शन आणि मोरया प्रॉडक्शनने मिळून सिनेमाची निर्मिती केली आहे. मुलाच्या दिग्दर्शकीय पदार्पणाबद्दल शरद पोंक्षे उत्सुक आहेत. शरद स्वतः या सिनेमाचे सह निर्माते आहेत. आता वडिलांप्रमाणे स्नेह मनोरंजन विश्वात स्वतःची छाप कशी पाडणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.

 

टॅग्स :शरद पोंक्षेसिद्धिविनायक गणपती मंदिर