Join us

​शशांक केतकर झळकणार भगवत गीतामध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2017 8:41 AM

शशांक केतकरने होणार सून मी या घरची, इथेच टाका तंबू यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. होणार सून मी या ...

शशांक केतकरने होणार सून मी या घरची, इथेच टाका तंबू यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. होणार सून मी या घरची या मालिकेत त्याने साकारलेली श्री ही भूमिका तर प्रचंड गाजली होती. छोट्या पडद्यावर य़श मिळाल्यानंतर तो मोठ्या पडद्याकडे वळला. त्याने वन वे तिकिट या चित्रपटात काम केले. या त्याच्या चित्रपटालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि आता तो पुन्हा एकदा एका चित्रपटात झळकणार असून त्या चित्रपटात तो प्रमुख भूमिका साकारणार आहे.शशांक केतकरचा एक मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर त्याने नुकतेच सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. भगवत गीता या चित्रपटात शशांक झळकणार असून या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अंकुर अरुण काकतकर यांचे आहे. अंकुर यांचे ‘ह्या गोजिरवाण्या घरात’ हे नाटक मराठी रंगभूमीवर सध्या गाजत आहे. भगवत गीता या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये नायक-नायिकेचे चेहरे आपल्याला ओळखता येत नाहीयेत. या चित्रपटातील नायक शशांक असून नायिका कोण आहे हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. या पोस्टरमध्ये नायक-नायिकेशिवाय एक कुरिययरची गाडी दिसत आहे. तसेच प्यार कभी एक तरफा नही होता, पनवती, फोन प्रेम, विद्या कृष्ण वासुदेव यांसारखे शब्द लिहिलेले दिसत आहे. शशांकने सोशल मीडियाला हे पोस्टर पोस्ट केल्यापासून शशांकसोबतची नायिका कोण आहे याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. एका विशिष्ट पोझमध्ये ती नायिका आपल्याला दिसत असल्याने नायिकेच्या नावावरून अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.