शशांक केतकरच्या आगामी सिनेमातील नायिकांची नावं तुम्हाला भटजींकडूनच कळतील!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 12:00 IST
अभिनेता शशांक केतकर कायमच काही तरी हटके करण्यासाठी प्रसिद्ध आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो फॅन्सशी कनेक्ट असतो.सोशल मीडियाच्या माध्यमातून ...
शशांक केतकरच्या आगामी सिनेमातील नायिकांची नावं तुम्हाला भटजींकडूनच कळतील!
अभिनेता शशांक केतकर कायमच काही तरी हटके करण्यासाठी प्रसिद्ध आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो फॅन्सशी कनेक्ट असतो.सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपल्या फॅन्ससह संवाद साधत असतो. इथंच तो आपल्या मालिका, नाटक, सिनेमाचंही प्रमोशन करतो. याशिवाय विविध सामाजिक विषयांवरही सोशल मीडियावर शशांक परखड मतं व्यक्त करत असतो. त्याचा उत्साह, एनर्जी आणि काही तरी हटके करुन फॅन्सना झटके देण्याची कला इथं वारंवार पाहायला मिळते. नुकतंच शशांकच्या आगामी सिनेमाचा मुहूर्त पार पडला. या मुहूर्तच्या वेळी छोटी पूजा पार पडली. या पूजेचा फोटो शशांकनं सोशल मीडियावर शेअर केला. मात्र खरा ट्विस्ट या फोटोमध्येच पाहायला मिळाला. या फोटोत शशांकसह सिनेमाच्या दोन नायिकाही आहेत. मात्र शशांकसह पूजेला बसलेल्या या दोन नायिका कोण हे कुणीच ओळखू शकत नाही. कारण शशांकनं पोस्ट केलेला फोटो हा पाठीमागून काढलेला आहे. त्यामुळे पाठमो-या बसलेल्या या अभिनेत्री कोण याबाबत चर्चा रंगल्या आहे. शशांकनं या फोटोला एक कॅप्शनही दिली आहे. नवीन फिल्म नवी टीम. आता या दोघी कोण हे सध्या तरी फोटोतील भटजीच सांगू शकतील. शशांकची ही पोस्ट पाहून रसिकांकडून शुभेच्छा आणि अभिनंदनाचा वर्षावर सुरु झाला आहे. मात्र सगळ्यात चर्चेचा विषय ठरला आहे तो शशांकच्या या सिनेमातील फोटोत दिसणा-या नायिका. शशांकला याबाबत विचारणाही होत आहे. काही रसिकांनी तर या पाठमो-या बसलेल्या अभिनेत्रींच्या नावांचाही अंदाज लावला आहे. या फोटोतील एक अभिनेत्री सायली संजीव तर दुसरी प्राजक्ता माळी असल्याचा अंदाज काही रसिकांनी वर्तवला आहे. या दोन्ही अभिनेत्री छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध नायिका असतील असंच बोललं जातंय. आता शशांकच्या या सिनेमातील नायिकांची नावं समोर येतील त्याचवेळी या सस्पेन्सवरुन पडदा उठेल. तोवर तुम्हीसुद्धा अंदाज लावा की या दोन अभिनेत्री कोण आहेत किंवा मग फोटोत दिसणा-या भटजीबुवांना शोधून त्यांनाच विचारा ! Also Read:'माणुसकीच्या भिंती'ने कच-यापासून घेतला मोकळा श्वास,शशांक केतकरच्या पोस्टनंतर प्रशासनाला जाग