Join us  

'त्या माझ्या सुपरवुमन आहेत...', सोनाली कुलकर्णीची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 12:21 PM

Sonalee Kulkarni: सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियावर शेअर केलेली लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हिने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. सोनाली सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते. तसेच ती बऱ्याचदा सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. दरम्यान तिने सोशल मीडियावर शेअर केलेली लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहे. 

सोनाली कुलकर्णी हिने इंस्टाग्रामवर दोन तरूणींसोबतचा फोटो शेअर केला आहे आणि लिहिले की, या सुंदर स्त्रिया मला कॅमेऱ्यात सुंदर दाखवतात ! माझी मेकअप आर्टिस्ट #ZoyaKhan आणि हेअर स्टायलिस्ट #Trupti याची खात्री बाळगतात की जेव्हा तुम्ही मला पडद्यावर पहाल तेव्हा मी माझ्या सर्वोत्तम दिसेन.तिने पुढे म्हटले की, सुंदर गृहिणी, माता आणि मुली असण्याबरोबरच या सुंदर कलाकार आहेत, त्यांच्या कुटुंबाला आधार देतात आणि खंबीरपणे उभ्या आहेत, आत्मनिर्भर, स्वावलंबी आहेत. त्या माझ्या सुपरवुमन आहेत.

सोनाली कुलकर्णीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर सध्या ती डान्स महाराष्ट्र डान्समध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसते आहे. तसेच लवकरच ती व्हिक्टोरिया या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत पुष्कर जोग मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय ती मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती छत्रपती ताराराणी यांच्या भूमिकेत झळकणार आहे. 

टॅग्स :सोनाली कुलकर्णी