Join us

"ती आमच्या घरी यायची आणि...", माधवी महाजनींचा त्या अभिनेत्रीबद्दल मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 12:09 PM

Ravindra Mahajani And Madhavi Mahajani : अभिनेते रवींद्र महाजनी यांची पत्नी आणि अभिनेता गश्मीर महाजनीची आई माधवी महाजनी सध्या चर्चेत आल्या आहेत. नुकतेच त्यांचे आत्मचरित्र चौथा अंक प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकात त्यांनी एका अभिनेत्रीचा किस्सा सांगितला आहे, जो चर्चेत आला आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील हॅण्डसम हंक अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांची पत्नी आणि अभिनेता गश्मीर महाजनी(Gashmeer Mahajani)ची आई माधवी महाजनी (Madhavi Mahajanee) सध्या चर्चेत आल्या आहेत. नुकतेच त्यांचे आत्मचरित्र चौथा अंक प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकात त्यांनी रवींद्र महाजनी यांच्याबद्दल आणि अभिनेत्याच्या निधनानंतर कुटुंबियांवर टीका झाली, त्यांच्या पत्नीला, मुलाला ट्रोल करण्यात आले. पण याची दुसरी बाजूही आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकातच त्यांनी रवींद्र महाजनी यांच्यामागे एक अभिनेत्री लग्नासाठी मागे लागली होती. तिचा किस्सा सांगितला आहे.

तारुण्यात रवींद्र महाजनी यांनी केलेल्या चुकांचा परिणाम त्यांना आणि कुटुंबाला आयुष्यभर भोगावा लागला, अशा बऱ्याच गोष्टींचा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे. तसेच एक अभिनेत्री रवींद्र महाजनींच्या प्रेमात होती आणि तिला त्यांच्यासोबत लग्न करायचे होते, असा उल्लेख पुस्तकात केला आहे. या पुस्तकात याबद्दल माधवी महाजनी यांनी सांगितलंय की, रवींद्र महाजनींसोबत एका सिनेमात काम केलेली अभिनेत्री त्यांच्या प्रेमात पडली होती. ती त्यांचे शूटिंग कुठे सुरू आहे, हे जाणून घेण्यासाठी घरी फोन करायची. घरातील नोकर फोन उचलायचा आणि तो सांगून टाकायचाय त्यानुसार ती अभिनेत्री त्यांच्या शूटिंग सेटवर जायची. ते ज्या हॉटेलमध्ये थांबले असतील तिकडेही ती जायची. त्यानंतर रवींद्रचा फोन यायचा हे विचारायला की, 'हिला कोणी सांगितले की मी इथे आहे म्हणून'.अनेकदा ते तिला टाळण्यात यशस्वी व्हायचे. पण कधी ती रुममध्येच यायची. 

ही अभिनेत्री अचानक घरी आली आणि...

त्यांनी त्या अभिनेत्रीचा आणखी एक किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या की, मी ऑफिसमध्ये होते आणि सासूबाई घरी होत्या. तर रवीचे शूटिंग मुंबईतल्या एका स्टुडिओमध्ये होते. ही अभिनेत्री अचानक घरी आली आणि घरातील बार उघडला. हॉलमध्ये पीत बसली होती. ती इतकी प्यायली होती की, ती बसल्या जागीच लवंडली. मी ऑफिस सुटल्यानंतर घरी आले तेव्हा सासूबाईंनी सगळा प्रकार सांगितला. तिला आम्ही आत खोलीत घेऊन गेलो.

गाडी स्लो झाली तेव्हा तिने कारमधून उडी मारली

जेव्हा रवी घरी आला. तेव्हा ती रवीला म्हणाली की, मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे. एवढेच नाही तर ती मलादेखील म्हणाली की, आपण दोघीही एकत्र राहू. शेवटी तिला तिच्या घरी सोडण्यासाठी तिला कसंबसं कारमध्ये बसवले. ह.रा.महाजनी मार्गावर गाडी स्लो झाली तेव्हा तिने कारमधून उडी मारली आणि कारसमोर जाऊन झोपली. मग आम्ही तिला कसंबसं कारमध्ये टाकले आणि माहीमला तिच्या आईच्या घरी सोडले. माधवी महाजनी यांनी अभिनेत्रीचे नाव न घेता हा किस्सा पुस्तकात सांगितला आहे.

टॅग्स :रवींद्र महाजनीगश्मिर महाजनी