Join us  

ही होती अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची पहिली पत्नी, या आजारामुळे झाले त्यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 7:00 AM

Laxmikant Berde: लक्ष्मीकांत बेर्डे यांची सिनेकारकीर्दच नाही तर वैयक्तिक आयुष्यदेखील चर्चेत राहिले आहे.

लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांनी आपल्या अभिनय आणि विनोदी कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. १९८४ साली आलेला चित्रपट लेक चालली सासरला, १९८५ साली धूमधडाका चित्रपटातून त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे १६ डिसेंबर, २००४ मध्ये एका गंभीर आजाराने निधन झाले होते. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या फॅमिलीबद्दल सांगायचे तर त्यांचे पहिले लग्न रुही यांच्यासोबत झाले होते. कालांतराने ते दोघे वेगळे झाले. त्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी १९९८ साली प्रिया बेर्डे यांच्यासोबत लग्न केले होते. लक्ष्मीकांत आणि प्रिया बेर्डे यांना दोन मुले आहेत स्वानंदी आणि अभिनय. हे दोघेही चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत.

लक्ष्मीकांत बेर्डे यांची चित्रपटातील कारकीर्द जेवढे चर्चेत आले तेवढे त्यांचे वैयक्तिक आयुष्य वादग्रस्त राहिले आहे. एका चित्रपटाच्या सेटवर लक्ष्मीकांत बेर्डे यांची प्रिया अरुण म्हणजेच प्रिया बेर्डे यांच्याशी भेट झाली आणि त्या दोघांनी लिव्ह इन मध्ये राहण्यास सुरुवात केली . मात्र, त्यापूर्वीच लक्ष्मीकांत बेर्डे यांचे लग्न झालेले होते. हे फार कमी लोकांना माहीत आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रिया अरुणसोबत लग्न करायच्या आधी देखील त्याची एक पत्नी होती.

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी रुही या प्रसिद्ध अभिनेत्री सोबत काम केले होते. कमाल माझ्या बायकोची या चित्रपटांमध्ये रुही यांच्यासोबत लक्ष्मीकांत बेर्डे यांनी काम केले होते. या चित्रपटामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अलका कुबल यांच्या पतीची भूमिका साकारली होती, तर रूही या चित्रपटात दुसऱ्या भूमिकेत होती. त्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी रुही यांच्यासोबत लग्न केले.

मात्र, एका चित्रपटाच्या सेटवर त्यांची प्रिया अरुण सोबत भेट झाल्यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे लग्न झालेले माहीत असतानाही प्रिया या त्यांच्यासोबत लिव्ह इन मध्ये राहत होत्या. त्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे देखील आपल्या घरी न जाता प्रिया यांच्या सोबतच राहत होते. लग्नाच्या तेरा वर्षानंतर रूही यांचे कॅन्सरच्या आजाराने निधन झाले. त्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रिया यांच्याशी लग्न केले. 

टॅग्स :लक्ष्मीकांत बेर्डेप्रिया बेर्डे