Join us

शिल्पा सांगतेय, एड्सवर मनमोकळेपणाने बोला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2016 1:45 PM

 एड्ससारख्या विषयावर आपल्याकडे खुल्यापणे कोणीच बोलत नाही. एखादा एड्स झालेला व्यक्ती जरी समोर आला तरी प्रत्येकाच्या त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन ...

 एड्ससारख्या विषयावर आपल्याकडे खुल्यापणे कोणीच बोलत नाही. एखादा एड्स झालेला व्यक्ती जरी समोर आला तरी प्रत्येकाच्या त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. लगेचच नजरा बदलतात आणि समोरच्या माणसाने काहीतरी भला मोठा गुन्हा केला आहे की काय असेच त्याला वाटते. परंतू आजा जग पुढे गेले आहे. बदलत्या युगानूसार माणसाला देखील स्वत:ची मानसिकता खरतर बदलण्याची आता गरज आहे. याविषयीच अभिनेत्री शिल्पा नवलकर सांगताता, खरं तर आपल्याकडे एड्स या विषयावरच मोकळेपणाने बोलले जात नाही. त्यामुळे नाटक, सिनेमा किंवा मालिका या माध्यमाद्वारे जनजागृती हा दुसरा टप्पा झाला. आपल्या समाजात एड्स हा विषय सेक्सशी संबंधीतच समजला जातो. म्हणून, कदाचित याबाबत कुठेच चर्चा होत नसते. पण एड्स होण्याची कारणं ही विविध आहेत. एड्स म्हणजे सेक्स असा टॅगच लावला गेलाय. समाजात या विषयावर चर्चा होणे गरजेचे आहे. आज शाळांमध्ये सेक्स एज्युकेशनचा समावेश केला गेलाय. पण एड्स या विषयावर कमीच किंवा अपूर्ण माहितीच दिली जातेय. याबाबात संवाद घडायला हवा. आई-वडील आणि मुलांमध्ये, मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये. हा स्टिग्मा काढला गेला पाहिजे. कलाकारांच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास फार कमी कलाकृती या विषयावर तयार केल्या गेल्या आहेत. काही सिनेमा तयार झाले मात्र याची संख्या फार कमी आहे. सिनेमा, नाटक, मालिका या माध्यमाद्वारे संदेश देता येत नाही, तर केवळ दाखवले जाते. शेवटी ज्याने त्याने आपापल्या पद्धतीने समज घ्यायचा असतो.