Join us

ही मराठी अभिनेत्री लवकरच छोट्या पडद्यावर करणार कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 17:06 IST

'तुला पाहते रे' या मालिकेत दिसली होती.

शिल्पाने तुळसकरने अनेक चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये काम केले आहे. तिने आजवर पलछीन, दिल मिल गये, संजीवनी, लेडीज स्पेशल यांसारख्या अनेक मालिकांद्वारे आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. तसेच डोंबिवली फास्ट, सनई चौघडे, शुगर सॉल्ट आणि प्रेम यांसारख्या चित्रपटांतील तिच्या भूमिका प्रेक्षकांना चांगल्याच आवडल्या आहेत. शिल्पा शेवटची ' तुला पाहते रे' या मालिकेत दिसली होती.

या मालिकेत तिने राजनंदिनी नावाची भूमिका साकारली होती.  या भूमिकेसाठी तिला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले होते.. त्यानंतर पुन्हा एकदा शिल्पा तिचं कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे.  'दादी अम्मा...दादी अम्मा...मान जाओ' या मालिकेत दिसणार आहे. शिल्पाने स्वत: ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्स सोबत शेअर केली आहे. यात ती रेखा नावाची भूमिका साकारणार आहे.ही मालिका आजी-आजोबांच्या कथेभवती फिरते.  ही हिंदी मालिका आजच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिल्पाचे लग्न विशाल शेट्टीसोबत झाले असून विवान आणि शैवा अशी त्यांच्या मुलांची नावे आहेत. 

टॅग्स :तुला पाहते रे