Join us

अजिंक्यचे शब्द ऐकून शिवानी भावूक, नवविवाहित जोडप्याच्या लग्नाचा सुंदर Video पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 13:48 IST

अगदी 'ड्रीम वेडिंग' वाटावं असंच त्यांचं लग्न झालं.

मराठी मनोरंजनसृष्टीत एका गोड कपलचा नुकताच विवाहसोहळा पार पडला. ती जोडी म्हणजे अजिंक्य ननावरे (Ajinkya Nanaware)आणि शिवानी सुर्वे(Shivani Surve). आधी साखरपुडा करत दोघांनी चाहत्यांना सरप्राईज दिलं. नंतर दुसऱ्याच दिवशी ते लग्नबंधनात अडकले. अगदी 'ड्रीम वेडिंग' वाटावं असंच त्यांचं लग्न झालं. ठाण्यातील येऊर येथील एका आलिशान रिसॉर्टमध्ये ते विवाहबद्ध झाले. त्यांच्या लग्नाचे सुंदर फोटो नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता त्यांचा 'वेडिंग व्हिडिओ' सुद्धा समोर आला आहे.

शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अखेर दोघांनी नात्यात एक पाऊल पुढे टाकत लग्न केले. दोघं त्यांच्या करिअरमध्येही चांगल्या वळणावर आहेत. त्यामुळे अशाच योग्यवेळी त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. अजिंक्य आणि शिवानी अनेक बाहेर फिरायला जातात तेव्हा त्यांच्या रोमँटिक फोटोंवर चाहते प्रेमाचा वर्षाव करतात. आता त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. यामध्ये अजिंक्य शिवावीवरचं प्रेम व्यक्त करताना म्हणतो, 'माझ्या आयुष्यात तिची खूप महत्वाची भूमिका आहे. तिने जशी आहे मला गरजेची आहे. म्हणूनच ती कायम मला माझ्यासोबत हवी आहे. थँक्यू...एवढी सोन्यासारखी मुलगी तुम्ही मला देताय."

अजिंक्यने व्यक्त केलेल्या या भावना ऐकून शिवानीही भावूक होते. तिच्या डोळ्यात पाणी येतं. नंतर दोघांच्या लग्नातील खास क्षण व्हिडिओमध्ये प्ले होतात. अजिंक्य शिवानीच्या लग्नात अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली. 'बिग बॉस मराठी' विजेती मेघा धाडेने त्यांची लग्नगाठ बंधली. शिवाय 'झिम्मा 2'चे कलाकारही लग्नाला आले. हेमंत ढोमे, सायली संजीव, सुहास जोशी यांनी हजेरी लावली. तर कुशल बद्रिकेही आवर्जुन आला होता. अगदी थाटात अजिंक्य शिवानीचा विवाहसोहळा पार पडला. 

टॅग्स :शिवानी सुर्वेमराठी अभिनेतालग्नसोशल मीडिया