Join us

'शिवरायांचा छावा' फेम अभिनेता भूषण पाटीलची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, शूटिंगला केली सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 18:35 IST

Bhushan Patil : भूषण पाटील बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकतेच त्याने हिंदी चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात देखील केली आहे.

'शिवरायांचा छावा' या सिनेमा काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात अभिनेता भूषण पाटील(Bhushan Patil)ने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती आणि तो प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. आता भूषण पाटील बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकतेच त्याने हिंदी चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात देखील केली आहे.

भूषण पाटील याबद्दल म्हणाला की,"आजवर मराठी सिनेमात अनेक भूमिका साकारल्या आणि त्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम देखील दिले. हिंदी चित्रपट विश्वात पदार्पण करणे हे माझ्यासाठी देखील आव्हानात्मक आहे. पहिला हिंदी सिनेमा आणि त्यात सुद्धा मुख्य भूमिका साकारायला मिळणं हे खूप भाग्याची गोष्ट आहे. बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे पण तेवढीच धाकधूक सुद्धा आहे. पण प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहणे हा एकच हेतू आहे आणि म्हणून हिंदी प्रेक्षकांना सुद्धा मी आपलंसे करून घेईन ही आशा आहे. तुमचे प्रेम कायम असच सोबत राहू दे." 

आजवर भूषणने अनेक महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत आणि कायम चर्चेत राहिला आहे. अभिनयातून त्याने कायम प्रेक्षकांना आपलंसे केले आहे आणि आता तो हिंदी प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी सज्ज आहे. आता भूषण नक्की कोणता हिंदी चित्रपट करतोय? या चित्रपटाचे नाव काय ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं लवकरच प्रेक्षकांना मिळतील.