Join us

धक्कादायक! अभिनय बेर्डेच्या फेक फेसबुक अकाऊंटवरून मुलीची फसवणूक, केली बोल्ड फोटोची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 16:15 IST

अभिनय बेर्डेच्या नावाने फेक फेसबुक अकाऊंट बनवून एका मुलीची फसवणूक करण्यात आल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.

लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा व अभिनेता अभिनय बेर्डेच्या नावाने फेक फेसबुक अकाऊंट बनवून एका मुलीची फसवणूक करण्यात आल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. तिला एका चित्रपटासाठी तुझा बोल्ड फोटो पाठवून दे असा मॅसेज करत या तरूणीला फसवण्यात आले आहे. याबद्दलची माहिती खुद्द प्रिया बेर्डे यांनी सोशल मी़डियावर दिली आहे. फेक फेसबुक अकाऊंटविरोधात कारवाई करणार असल्याचंही त्यांनी या पोस्टमध्ये सांगितलं.

अभिनयच्या फेक अकाऊंटचा स्क्रीन शॉट प्रिया यांनी शेअर केला आहे. त्यासोबत त्यांनी लिहिले, “सावधान.. हे प्रोफाइल अभिनयचे नाही. या प्रोफाइल वरून एका मुलीला कॉन्टॅक्ट केलं गेलं आणि सांगितलं की नागराज मंजुळे बरोबर एक फिल्म करतो आहे आणि त्यात बोल्ड सीन आहेत. तुझा एक बोल्ड फोटो पाठवून दे तर त्या मुलीने आम्हाला कॉन्टॅक्ट करून वरील माहिती दिली. तेव्हा प्लीज कुणीही याची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका, आम्ही एक्शन घेत आहोत. या आधीही मी याबाबत पोस्ट टाकली होती हे ही नमूद करतेय.

प्रिया बेर्डे यांनी वेळीच अभिनय बेर्डेच्या फेक अकाउंटबद्दल सांगून चाहत्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.

टॅग्स :प्रिया बेर्डेस्वानंदी बेर्डेअभिनय बेर्डे