Join us
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक!, या मराठी अभिनेत्रीची फसवणूक करून केले होते खोटे लग्न, एकेदिवशी असा झाला होता पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 14:59 IST

लग्नाच्या काही महिन्यानंतर तिला एक फोन आला आणि जे सत्य समोर आले ते समजल्यावर तिला खूप मोठा धक्का बसला.

'बिग बॉस मराठी' सीझन १ मधून स्मिता गोंदकर हे नाव घराघरात पोहोचले. 'पप्पी दे पारुला' म्हणत तिने रसिकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. स्मिता गोंदकर विविध सिनेमांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत रसिकांच्या मनात घर केलं आहे. स्मिता गोंदकरच्या आयुष्यातील धक्कादायक बाब फार कमी लोकांना माहित आहे. स्मिता एका माजी नगरसेवकाच्या प्रेमात पडली होती आणि त्यांनी लग्न देखील केले होते. मात्र लग्नाच्या काही महिन्यानंतर तिला एक फोन आला आणि जे सत्य समोर आले ते समजल्यावर तिला खूप मोठा धक्का बसला.

एका मराठी संकेतस्थळाच्या रिपोर्टनुसार, स्मिता गोंदकरची ओळख माजी नगरसेवक सिद्धार्थ बाठिया याच्यासोबत झाली होती. त्यानंतर त्यांच्या भेटीगाठी वाढल्या आणि त्यांचे लग्नदेखील झाले. त्यांचे लग्नही अगदी थाटामाटात पार पडले होते. लग्नानंतर वर्सोवा येथे ती सिद्धार्थ सोबत राहत होती. मात्र अवघ्या तीन महिन्यांनंतर तिला एका महिलेचा फोन आला आणि ‘मी सिद्धार्थची पत्नी आहे आणि आम्हाला दोन मुलं देखील आहेत’ अशी धक्कादायक माहिती तिने स्मिताला सांगितली. 

याबाबत तिने सिध्दार्थला विचारले त्यावेळी त्याने अगोदरच पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट घेतला असल्याचे सांगितले. त्याचे पुरावे देखील त्याने आणून दाखवले त्यावर स्मिताने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. एवढेच नाही तर स्मिताचा विश्वास बसावा म्हणून त्याने स्मितासोबतच्या लग्नाचे सर्टिफिकेट बनवून आणले. यावर विश्वास बसल्यामुळे स्मिताने त्या गोष्टींकडे कानाडोळा केला आणि पुन्हा तिने आपला संसाराचा गाडा पुन्हा सुरळीत चालवला. दरम्यान कुठल्याही फंक्शनला स्मिता आणि सिद्धार्थ एकत्रित जात त्यामुळे सर्वांनाच तिचे लग्न झाले आहे हे समजले होते.

लग्नाच्या वाढदिवशी देखील त्यांनी अनेकांना आमंत्रित केले होते. त्याचे फोटो वृत्तपत्रात देखील छापले गेले होते. यानंतर काही दिवसांनी एक महिला स्मिताच्या घरी आली त्या महिलेने ‘मी सिध्दार्थची पत्नी असल्याचे सांगितले’. तिचे सर्व बोलणे ऐकून घेतल्यावर स्मिताने घटस्फोट घेतलेल्या कागदपत्रांची चौकशी केली. ते सर्व कागदपत्र खोटे असल्याचे तिच्या निदर्शनास आले. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच सिद्धार्थ विरुद्ध तिने तक्रार नोंदवली. त्यावेळी अनेक वृत्तपत्रांमधून ही बातमी छापण्यात आली होती. 

ही बाब जेव्हा समोर आली त्यावेळी सिध्दार्थने स्मितासोबत लग्नच केले नसल्याचा पोलिसांसमोर बनाव केला. ‘आम्ही लग्नाचे केवळ शूटिंग करत होतो’ असे धक्कादायक वक्तव्य त्याने त्यावेळी केले होते. हे सर्व ऐकून स्मिता आणखीनच खचून गेली. या सर्व प्रकरानंतर ती कोलमडून गेली होती. त्यानंतर ती काही काळ सिनेइंडस्ट्रीतून गायब होती. या सर्व घटनांमधून स्वतःला सावरत पुन्हा एकदा नव्याने ती सिनेइंडस्ट्रीत दाखल झाली. 

स्मिता गोंदकर मराठी बिग बॉस शो, काय घडलं त्या रात्री मालिका, कॉमेडी बिमेडी शोमध्ये झळकली आहे. तसेच तिने भय या चित्रपटातही काम केले आहे.

टॅग्स :स्मिता गोंदकरबिग बॉस मराठी